Maharashtra State Commission for Woman rupali chakankar on baba ramdev controversy Maharashtra news  esakal
महाराष्ट्र बातम्या

Baba Ramdev : महिलांवरील टिप्पणी रामदेव बाबांना भोवणार? महिला आयोगाने घेतली दखल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महिलांच्या कपड्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर बाबा रामदेव हे अडचणीत सापडले आहेत, दरम्यान त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोग त्यांच्या वक्तव्याबद्दल रामदेव बाबांना नोटीस पाठवणार आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

रामदेव बाबा यांनी महिलांच्या बाबतीत केलेल्या विधानानंतर या विधानाचा खुलासा द्यावा, यासाठी महिला आयोग नोटीस बजावणार असल्याचे चाकणकर यांनी सांगितले. रामदेव बाबा यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

राजकीय क्षेत्रातून देखील बाबा रामदेव यांच्यावर टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी, "हे अतिशय धक्कदायक विधान आहे. हा स्वतःला बाबा समजोय, भगवी वस्त्रे परिधान करतो. करोडोनं सरकारी जागा बळकावतो. उद्योगधंदे सुरु करतो. सिनेमातील हिरोईन्स याच्याकडं योगासनं शिकतात आणि हा बाबा अशा प्रकारे महिलांबाबत बोलतो. तिथं उपस्थित महिलांनी त्याला तिथंच झोडपून काढायला हवं होतं. एका भगवे वस्त्र परिधान केलेल्या बाबाला हे शोभत नाही. हा सन्यासी आहे तर बायकांकडे बघतो कशाला?" अशी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं घडलं काय?

रामदेव म्हणाले की, महिला साड्या नेसून पण चांगल्या वाटता, महिला सलवार सूटमध्ये सुद्धा चांगल्या वाटतात, आणि माझ्या नजरेने काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात. यावरून आता टीका होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT