Gautami Patil  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Gautami Patil च्या 'त्या' व्हिडिओविरुद्ध राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल

गौतमीच्या नकळत तिचा व्हिडीओ तयार करणाऱ्यावर कारवाई होण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका २६ वर्षीय तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार तरुणी गौतमी पाटील यांच्या सहकारी आहेत. दरम्यान, पाटील यांचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ गुपचूप काढण्यात आला. त्यानंतर तो व्हिडिओ गौतमी पाटील यांच्या नावाने बनावट इन्स्टाग्रामवर खाते काढून अपलोड करण्यात आला. तसेच, तो व्हायरल केला गेला. अज्ञाताने इन्स्टाग्रामसोबत व्हाट्सअपवर देखील तो व्हिडिओ टाकून प्रसारित केला.

या घटनेप्रकरणाची राज्य महिला आयोगाला देखील दखल घ्यावी लागली आहे. महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरता कृती कार्यक्रम जाहीर करा, असा आदेश राज्य महिला आयोगाने सायबर विभाग आणि पोलीस महानिरीक्षकांना दिले आहेत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत ट्विट केलं आहे. “महिलांबाबतचे सायबर गुन्हे रोखण्याकरिता कृती कार्यक्रम जाहीर करावा असे महिला आयोगाने सायबर विभाग, पोलीस महानिरीक्षक यांना पत्राद्वारे कळवले आहे”, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

ट्विटमध्ये रूपाली चाकणकर म्हणतात की, “लावणी कलाकार गौतमी पाटील यांचे चोरुन चित्रीकरण करत चेंजिंग रुममधील खासगी व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे येथे तक्रार नोंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे”, असं चाकणकर यांनी सांगितलं आहे.

“एकंदरीतच महिलांच्याप्रती सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. हे प्रकार रोखण्याकरिता विशेष पथकाचे शीघ्र कृती दल स्थापन करून धडक कार्यवाही मोहीम राबविल्यास गुन्हेगारांना वचक बसून गैरप्रकार आटोक्यात येतील”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT