ओमिक्रॉन Corona variant sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनच्या रुग्णांची नोंद नाही

कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला एकही रुग्ण अद्यापपर्यंत पुण्यासह राज्यात आढळलेला नाही.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या नवीन व्हेरियंट ओमिक्रॉनचा संसर्ग झालेला एकही रुग्ण अद्यापपर्यंत पुण्यासह राज्यात आढळलेला नाही. तसेच, देशातील कोणत्याही राज्यात याची नोंद झाली नसल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. आफ्रिका आणि शेजारच्या वेगवेगळ्या देशांमधून प्रवास करून मुंबई आणि पुण्यात आलेल्या भारतीय नागरिकांची तपासणी सध्या करण्यात येत आहे.

या प्रवाशांची जसजशी माहिती मिळेल, त्या प्रमाणे त्यांचे नमुने घेऊन त्यांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीतून त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाल्यास त्याचे जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेसिंग) करण्यासाठी ‘राष्ट्रीय विषाणू संस्था’ (एनआयव्ही) येथे पाठविण्यात येणार आहे. त्यातून खऱ्या अर्थाने कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये ओमिक्रॉन हा नवीन व्हेरियंट आहे किंवा नाही ते समजू शकेल, अशी माहिती राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.

कोरोना झालेल्या रुग्णामध्ये नेमका कोरोनाचा विषाणूच्या कोणता व्हेरियंट आहे, याची निश्चित माहिती पाच ते सहा दिवसांनंतर मिळते. त्यासाठी पुण्यातून नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तसेच, काही नमुने कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, मीरा-भाईंदर या भागातून तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली आहेत. यातून कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये लगेच नवीन व्हेरियंट आढळला असा अर्थ होत नाही. ते नेहमीप्रमाणे कोरोनाबाधित आहेत, असा अर्थ होतो. पण, त्याचे जनुकीय क्रमनिर्धारण केल्यानंतर तो नेमका कोणता व्हेरियंट आहे, हे समजू शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavitaran PRO Suspended : कोल्हापूर महावितरणचे जनसंपर्क अधिकारी तडकाफडकी निलंबीत, स्मार्ट मिटर कॅमेरा प्रकरण भोवलं; प्रशासकीय विभागात खळबळ

रोहित शर्माचा BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चेचा प्रयत्न अन्...! आगरकरच्या अल्टिमेटमनंतर हालचाल; लॉर्ड्सवर नेमकं काय होणार?

Latest Marathi News Live Update : अर्नाळाच्या समुद्रात बुडालेल्या २ मुलांपैकी एकाचा २४ तासानंतर मृतदेह मिळाला; आणखी एकाचा शोध सुरु

Apple Discount Offer : फ्रीमध्ये मिळतायत AirPods Pro अन् Apple Pencil; 'या' ग्राहकांसाठी ॲपलची स्पेशल ऑफर

Karnataka Covid Cases : महाराष्ट्राशेजारील कर्नाटकात कोरोना रुग्णांमध्ये 10 दिवसात मोठी वाढ; नव्या रुग्णांची नोंद झाल्याने वाढली चिंता, नेमकी काय आहे स्थिती?

SCROLL FOR NEXT