st 
महाराष्ट्र बातम्या

तुम्हाला माहितीय का ! गणेशोत्सव रद्द अन्‌ लॉकडाउनमुळे लालपरीला 'एवढा' तोटा 

तात्या लांडगे

सोलापूर : अंधार असो की पावसाळा-उन्हाळा, यातून मार्ग काढत प्रवाशांची रात्रंदिवस सेवा करणारी लालपरी लॉकडाउनमुळे अडचणीत सापडली आहे. यंदा कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा केला जाणार असल्याने लालपरीला अंदाजित 10 कोटी रुपयांचा फटका बसेल, अशी माहिती राज्याचे वाहतूक व्यवस्थापक राहूल तोरो यांनी दिली. तर लॉकडाउनमुळे दररोज सरासरी 22 कोटींचे उत्पन्नही बुडाल्याचे ते म्हणाले. 


दरवर्षी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साडेतीन ते चार हजार एसटी बस गणेशोत्सवासाठी सोडल्या जात होत्या. मात्र, यंदा जिल्हाबंदीमुळे एकही बस सोडली जाणार नाही. साडेसतरा हजार बस आणि एक लाख पाच हजार कर्मचाऱ्यांचा पसारा सांभाळणारे महामंडळ लॉकडाउनमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांनी विविध योजना तयार केल्या आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी संपूर्णपणे लॉकडाउन उठल्यावर केली जाणार आहे. तत्पूर्वी, दररोज सरासरी 22 कोटींचे उत्पन्न मिळविणारी लालपरी मागील अडीच महिन्यांपासून उत्पन्नाच्या तुलनेत तोटाच सहन करीत आहे. 


ठळक बाबी... 

  • महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वार्षिक उत्पन्न सरासरी साडेसात हजार कोटी अन्‌ खर्च आठ हजार कोटींचा 
  • राज्यात लालपरीचे 31 विभाग अन्‌ 251 आगारातून केले जात होते गणेशोत्सवाचे दरवर्षी नियोजन 
  • मुंबई-कोकण, मराठवाडा, पुणे-कोल्हापूरसह अन्य विभागातून गणेशोत्सवासाठी स्वतंत्र तीन हजार गाड्यांची होती सोय 
  • कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव साध्या पध्दतीने होणार साजरा: दहा कोटींचे उत्पन्न पुन्हा होणार कमी 
  • जिल्हाबंदी उठल्याशिवाय लालपरी सावरणार नाही: महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण 

चालक-वाहकांची करा कोरोना टेस्ट 
राज्यभरातील लॉकडाउन 30 जूनपर्यंत असतानाही अत्यावश्‍यक सेवा म्हणून राज्य परिवहन महामंडळाची सेवा सुरु करण्यात आली आहे. वाहतूक करताना चालक-वाहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर चालक-वाहकांची कोरोना टेस्ट करण्याची मागणी महामंडळाकडे केली आहे. तरीही स्थानिक प्रशासनाकडून त्याची गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसून येत नाही. परिणामी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून येते. कुर्ला नेहरू आगारातील सुमारे 12 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून काही कर्मचाऱ्यांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखीचा त्रास सुरु झाला आहे. ही बाब अत्यंत धोकादायक असून त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम वाहतुकीसह त्यांच्या कुटुंबावरही होणार आहे. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची तत्काळ कोरोना टेस्ट करावी, अशी मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

२८ वर्षांनंतर भारतीय क्रिकेट इतिहासात घडणार दुर्मिळ क्षण? एकाच दिवशी दोन देशात कसे खेळणार भारतीय संघ

Vadodara Mumbai Expressway : महाराष्ट्रातून दिल्ली अन् जयपूर गाठणे होणार सोपे! वडोदरा-मुंबई एक्सप्रेसवेचा 'हा' मार्ग वाहतुकीसाठी सज्ज; PM मोदींच्या हस्ते उद्घाटन

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

SCROLL FOR NEXT