petrol sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यभरात इंधनाच्या दराचा भडका कायम

मुंबई शुक्रवारी पेट्रोल 29 तर डिझेल 37 पैशांने महागले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील इंधनाच्या कच्चा तेलाचे दर वाढल्याने आता पुन्हा एकदा इंधनाच्या दरवाढीचा भडका उडाला आहे. शुक्रवारी मुंबईत पेट्रोल 29 तर डिझेल 37 पैशाने महागले असून, औरंगाबाद, नांदेड आणि परभणीत डिझेलच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठत शंभरी पार केली आहे. त्यामुळे एकूणच राज्यभरात शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा भडका उडाला असून, दरवाढ सातत्याने सुरू राहिल्यास इंधन दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होऊन महागाईची शक्यताही अर्थतज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

मुंबईत शुक्रवारी पेट्रोल 109.54 तर डिझेल 99.92 रुपये प्रति लिटर दराची नोंद करण्यात आली आहे. यातुलनेत राज्यभरात विविध जिल्ह्यात इंधनाच्या दराचा उच्चांक बघायला मिळाले आहे. मुंबईसह मुंबई उपनगर, अमरावती, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नंदुरबार, उस्मानाबाद,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये डिझेल चे दर शंभरीच्या मार्गावर आहे. तर राज्यभरात पेट्रोलच्या दरानेही सर्वसामान्यांचे खिशांना कात्री लावली असून, 110 ते 111 रुपये प्रति लिटर दराची नोंद झाली आहे.

इंधनाच्या दरासह सीएनजी, पीएनजीसह खाद्य तेल आणि सर्वच जीवनावश्यक वास्तूंचेही दरवाढ होत आहे. त्यामुळे इंधनाची दरवाढ होत असल्याने त्याचा परिणाम सर्वसमान्यांवर होणार आहे. शेतमालासह, उत्पादित वस्तूंचे दर दुप्पट वाढतच आहे. सध्या 7 टक्याने महागाई वाढली असून, संघटित कामगारांना तर याच फटका आहेच त्याशिवाय 97 टक्के असंघटित वर्गाला सुद्धा महागाईचा फटका बसतो आहे. शिवाय या महागाईमुळे असंघटित कामगारांचा पगार आल्या पावली संपत आहे. घरातील दैनंदिन गरजा आणि घरभाडे, आरोग्य, शिक्षणासाठीही असंघटित कामगार करू शकत नाहीये. त्यामुळे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती सध्या सर्वसामन्यांची झाली आहे. त्यामुळे महागाईचे दुष्टचक्र महागाईला अधिक गरीब बनवत तर बाजारातील महागाईची विषमता वाढवत असल्याचे अर्थतज्ञ विश्वास उटगी यांनी सांगितले आहे.

10 महानगरातील इंधनाचे दर

महानगर - पेट्रोल डिझेल

मुंबई - 109.54 - 99.92

चंदीगड - 99.67 - 91.85

बंगळुरू - 107.14 - 97.77

दिल्ली - 103.54 - 92.12

चेन्नई - 101.1 - 96.60

कोलकाता - 104.23 - 95.23

पटना- 106.59 - 98.65

रायपूर - 101.44- 99.59

पणजी - 101.38 - 97.37

रांची - 98.9 - 97.24

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

Nashik Ration Shops : ग्रामपंचायती अन् बचत गटांची प्रतीक्षा संपणार कधी? नवीन रेशन परवान्यांसाठी नाशिककर आक्रमक

Pune News: वारज्यात महामार्गाचीच कोंडी! दीड किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो दीड तास; काय आहेत काेंडीची कारणे..

फक्त एका मालिकेमुळे रातोरात प्रसिद्ध झाली अभिनेत्री नंतर अचानक झाली गायब; आता ओळखणंही झालं कठीण

Latest Marathi News Update : नागपूर विमानतळावरील सुरक्षा मशिन्स पूर्ववत सुरू

SCROLL FOR NEXT