Sugar Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात यंदा १०.६२ लाख टन साखरेचे उत्पादन

राज्यात यंदाच्या २०२०-२१ च्या हंगामात ९५ सहकारी आणि ९५ खासगी असा एकूण १९० कारखान्यांनी साखरेचे उत्पादन घेतले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात (Maharashtra) यंदाच्या हंगामात गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजे एक हजार १२ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप (Sugarcane) झाले असून, १०.६२ लाख टन साखरेचे उत्पादन (Sugar Production) घेण्यात आले आहे. गतवर्षीच्या हंगामात ५५० मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. राज्यात अद्याप चार साखर कारखाने (Sugar Factory) सुरू असून, येत्या तीन-चार दिवसांत यंदाचा हंगाम संपेल, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी दिली. (Maharashtra State produced 10.62 lakh Tonnes of Sugar this year)

राज्यात यंदाच्या २०२०-२१ च्या हंगामात ९५ सहकारी आणि ९५ खासगी असा एकूण १९० कारखान्यांनी साखरेचे उत्पादन घेतले. त्यापैकी १८६ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. औरंगाबाद विभागातील जालना जिल्ह्यासह तीन साखर कारखाने आणि नगर विभागातील एका कारखान्यामध्ये गाळप हंगाम सुरू आहे. तेथील हंगामही चार दिवसांत पूर्ण होणार आहे.

यंदा सर्वाधिक गाळप कोल्हापूर विभागात झाले असून, साखरेच्या सरासरी उताऱ्याचे प्रमाण १२ टक्के इतके आहे. तर, पुणे विभाग ऊस गाळपात दुसऱ्या क्रमांकावर असून, सरासरी साखर उतारा १०.९७ टक्के इतका आहे.

विभागनिहाय ऊस गाळप (मेट्रिक टन), साखरेचे उत्पादन (लाख क्विंटलमध्ये) आणि उतारा टक्केवारी -

कोल्हापूर २३१.०९ २७७.३८ १२

पुणे २३०.९३ २५३.२६ १०.९७

सोलापूर १७५.८६ १६४.८९ ९.३८

नगर १६९.६४ १६६.५८ ९.८२

औरंगाबाद १००.०३ ९६.९० ९.६९

नांदेड ९४.२८ ९४ ९.९७

अमरावती ५.८२ ५.२० ८.९३

नागपूर ४.३५ ३.९० ८.९७

पुणे जिल्ह्यातील गाळप हंगाम

पुणे जिल्ह्यात यंदा बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर साखर कारखाना, माळेगाव साखर कारखाना, इंदापूर तालुक्यातील छत्रपती साखर कारखाना, कर्मयोगी शंकरराव पाटील, नीरा भीमा, जुन्नर तालुक्यातील विघ्नहर, भोर तालुक्यातील राजगड, मुळशी तालुक्यातील श्री संत तुकाराम, शिरूर तालुक्यातील घोडगंगा, आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर या दहा सहकारी साखर कारखान्यांनी हंगाम घेतला. तर, दौंड तालुक्यातील श्रीनाथ म्हस्कोबा, अनुराज शुगर्स, दौंड शुगर, इंदापूर तालुक्यातील बारामती ॲग्रो, शिरूर तालुक्यातील व्यंकटेशकृपा शुगर मिल्स आणि पराग ॲग्रो फुड॒स या सहा खासगी कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident Side Story : कोल्हापूर अपघात घटना, तिघांच्या मृत्यूने गाव हळहळलं; फुलांच्या माळा, मिठाईचे डबे, दिवाळी खरेदी पिशव्या पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू...

Bhau Beej Travel: भाऊबीजच्या दिवशी भावाला घेऊन जा 'या' खास ठिकाणी; आठवणी ठरतील खास!

Diwali Padwa 2025 Marathi Wishes: नात्यात सदा राहो गोडवा, नवऱ्याला पाठवा दिवाळी पाडव्याचा मराठीतून खास शुभेच्छा

Viral News : ही बाई आहे की हैवान? गाढ झोपलेल्या नवऱ्यावर टाकले उकलते पाणी, नंतर अ‍ॅसिडने केला हल्ला, धक्कादायक कारण समोर...

Gold Rate Today : दिवाळी पाडव्यादिवशी सोन्या-चांदीत घसरण; तुमच्या शहरातील नवीन भाव काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT