st sakal
महाराष्ट्र बातम्या

'परिवहन'ची मोठी कारवाई! 24 हजार कर्मचाऱ्यांचा परतीचा दरवाजा बंद

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनकरण करा, या मागणीसाठी अजूनही आंदोलन सुरुच

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनकरण करा, या मागणीसाठी अजूनही आंदोलन सुरुच आहे. या आंदोलनात पुढारपण करणारे तब्बल पाच हजार 555 कर्मचारी बडतर्फ केले आहेत. सात हजार 235 कर्मचाऱ्यांना बडतर्फीची तर 11 हजार 24 कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस बजावली आहे. वारंवार आवाहन करूनही कामावर न आलेल्या त्या 23 हजार 814 कर्मचाऱ्यांचा परतीचा मार्ग बंद झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.(Maharashtra State Transport Corporation Big action)

दिवाळीच्या सणात महामंडळाला सर्वाधिक उत्पन्नाची अपेक्षा असते. तरीही, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचवेळी विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन पुकारले. सुरवातीला भाजप आमदार गोपिचंद पडळकर व रयतक्रांतीचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलनात उडी घेतली. मात्र, परिवहनमंत्री ऍड. परब यांनी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिल्यानंतर त्यांनी आंदोलनातून माघार घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे आवाहन केले. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बैठक घेऊन आंदोलनाचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला.

बैठकीनंतर परिवहनमंत्र्यांनी कामावर येणाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्याचा शब्द दिला. तरीही, जवळपास 34 हजार कर्मचारी अजनूही आंदोलनावर ठाम राहिले. तीन महिन्यांपासून लालपरीची वाहतूक विस्कळीत झाली असून आंदोलनामुळे महामंडळाला जवळपास बाराशे कोटींचा फटका बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या काही बसगाड्या मार्गावर धावत असतानाही महामंडळाला अपेक्षित मिळत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे आता आंदोलकांवरील कारवाई कठोर केली जात आहे. निलंबनाची व बडतर्फीची नोटीस दिलेल्यांसह बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर हजर करून घेऊ नका, असे विभाग नियंत्रकांना वरिष्ठांचे आदेश आहेत. ज्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही, त्यांनाही काही दिवसांची मुदत देऊन कामावर हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कारवाईची राज्यातील स्थिती...

  • महामंडळाचे एकूण कर्मचारी - 92,266

  • कामावर हजर कर्मचारी - 34,282

  • बडतर्फ कर्मचारी - 5,555

  • बडतर्फीची नोटीस - 7,235

  • निलंबीत कर्मचारी - 11,024

''वेतनवाढीनंतर महामंडळ वाचविण्यासाठी कामावर या, विलीनीकरणाचा लढा कामावर हजर राहूनही लढता येऊ शकतो, असे सातत्याने आवाहन करूनही बहुतेक कर्मचारी कामावर रुजू झालेले नाहीत. त्यामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांसह बडतर्फ आणि निलंबनाची नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांना आता कामावर हजर करून घेतले जात नाही. कोणतीही कारवाई न झालेल्यांना हजर करून घेतले जात आहे.''

- विलास राठोड, विभाग नियंत्रक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ‘’नितीश कुमार यांना भारतरत्न द्या’’, जेडीयू नेते केसी त्यागींची पत्राद्वारे पंतप्रधान मोदींकडे मागणी!

WPL 2026 : Nadine de Klerk ची अष्टपैलू कामगिरी, RCB ने थरारक सामन्यात मारली बाजी; गतविजेत्या MI ची हार

महत्त्वाची बातमी! महापालिका निवडणुकीचा प्रचार मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता थांबणार; उमेदवारांचे पदयात्रा, घरोघरी भेटींवर भर, सोशल मिडियाचा वापर, वाचा...

Rahul Gandhi Attacks on BJP : दूषित पाणी, विषारी कफ सिरप ते अंकिता भंडारी हत्या ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात!

HSC Hall Ticket 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! परीक्षेचे प्रवेशपत्र 'या' दिवसापासून मिळणार!

SCROLL FOR NEXT