गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या उकाड्यामुळे फक्त माणसंच नाही तर जनावरंही हैराण झाली आहेत. अनेक ठिकाणी फिरूनही पशू-पक्ष्यांना पाणी मिळत नाहीये. अशातच एका पोलीस कर्मचाऱ्याने एका माळशेज घाटात तहानलेल्या माकडाला पाणी पाजून त्याची तहान भागवली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Maharashtra Traffic police feed water to thirsty monkey in Malshej Ghat, video goes viral)
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे. माळशेज घाटात ड्युटीवर असताना ठाण्याचे वाहतूक पोलीस कर्मचारी संजय घुडे यांना तहानलेलं माकड दृष्टीस पडलं. माकडाला पाणी प्यायचंय हे लक्षात आल्यामुळे त्यांनी त्यांनी माकडाला पाणी पाजले. वाहतूक पोलीस कर्मचारी संजय घुडे तहानलेल्या माकडाला पाणी पाजत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. संजय घुडे यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
Susanta Nanda IFS यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट मिळत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.