महाराष्ट्र बातम्या

मॉल, रेस्टॉरंट, मंदिरं उघडण्याबाबत एकमत, पण...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता आणताना लसीचे दोन डोस घेणे सक्तीचे करण्यावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. हॉटेल, मॉल आणि प्रार्थना स्थळांवरील निर्बंध उठविताना काही बंधने देखील घालण्यात यावी, यावर टास्क फोर्समधील सदस्यांचे एकमत होते. तिसरी लाट आली तर तातडीने निर्बंध आणण्यासाठी कोणते निकष असायला हवेत, याविषयी सविस्तर नियमावली तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

टास्क फोर्सच्या आजच्या बैठकीत संभाव्य तिसरी लाट, ऑक्सिजनची लागणारी गरज, लसीकरणाचा वेग वाढवणे, ट्रेसिंग, ट्रेकिंग वाढवणे, तसेच येणाऱ्या काळात आणखीही काही क्षेत्रांच्या बाबत सावधानता बाळगून, कशा प्रकारे निर्बंधात शिथिलता आणायची यावर चर्चा झाली. आजच्या बैठकीतील सूचनांच्या अनुषंगाने टास्क फोर्स नियमावली तयार करीत आहे.

या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य सचिव सीताराम कुंटे, डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, मेहुल मेहता, डॉ. झहीर विराणी, डॉ. राहुल पंडित, वसंत नागवेकर, डॉ. सुहास प्रभू, डॉ. अजित देसाई, अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) डॉ. प्रदीप व्यास उपस्थित होते.

15 ऑगस्टपासून मुंबई लोकल होणार सुरू

मुंबईची लाईफलाईन 15 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 ऑगस्टपासून लोकल सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Protest : आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, म्हणाले- संवादाचा अभाव कोणाच्याही हिताचा नाही

Navi Mumbai Municipal Schemes: प्रशिक्षणानंतर थेट नोकरी देण्याचा प्रयत्न, नवी मुंबई पालिकेचा विविध योजनांचा धमाका

Live Updates Marathi : भाजप सरकार गोरगरिबांवर लाठ्या चालवतं; मनोज जरांगेंनी जंतर मंतरवर व्यक्त केला संताप

ITR Deadline: सर्वांसाठी 31 जुलैची तारीख नाही! शेअर बाजारातील एक ट्रेड केला तरी बदलू शकते ITR डेडलाइन; पाहा नियम

माझ्याजवळ येऊन झोप...! नामांकित शाळेच्या मुख्याध्यापकाकडून १५ वर्षीय विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT