Rajesh Tope  
महाराष्ट्र बातम्या

Unlock : हॉटेल्स, रेस्तराँ आणि मॉल्स रात्री 10 वाजेपर्यंत राहणार सुरु

राज्य मंत्रिमडळाच्या बैठकीत निर्णय

Amit Ujagare (अमित उजागरे)

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अनलॉकबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार, हॉटेल, रेस्तराँ आणि मॉल्स आता रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. येत्या १५ ऑगस्टपासून ही नवी नियमावली लागू होईल. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली.

टोपे म्हणाले, आरोग्य विभागाकडून कोरोनाचे निर्बंध कमी करण्याबाबत जो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला होता. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार, १५ ऑगस्टपासून मोठी शिथीलता देण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईतील लोकल ट्रेन्स, हॉटेल-रेस्तराँ आणि मॉल्स यांबाबत नियम शिथील करण्यात आले आहेत. त्यानुसार, मॉल्समध्ये प्रवेशासाठी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणं बंधनकारक असेल. तसेच लोकलप्रवासासाठी दोन डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आणि स्वतःचं ओळखपत्र प्रवासादरम्यान आणि पाससाठी आवश्यक असेल.

हॉटेल व्यावसायिकांना दिलासा

हॉटेल आणि रेस्तराँना ५० टक्क्यांपर्यंत ग्राहकांसाठी मान्यता देण्यात आली आहे. तसेच खुले लॉन्स आणि मैदानांमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यांना जास्तीत जास्त २०० लोकांना परवानगी तर हॉलमध्ये होणाऱ्या समारंभांना तिथल्या आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा १०० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे, असंही टोपे म्हणाले.

शॉपिंग मॉल्सबाबत नवी नियमावली

महाराष्ट्रात सर्वत्र संपूर्ण आठवडाभर शॉपिंग मॉल्स रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण तिथं जाणाऱ्या ग्राहकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले आवश्यक असून दुसऱ्या डोसनंतरही चौदा दिवस पूर्ण झालेले असावेत. तसं प्रमाणपत्र दाखवणाऱ्या व्यक्तींना तिथे प्रवेश दिला जाणार आहे.

सिनेमागृह, नाट्यगृहे, धार्मिक स्थळे तुर्तास बंदच

सर्व प्रकारची दुकानं आता रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहेत. तसेच धार्मिक स्थळांना पुढील आदेशांपर्यंत पूर्ण बंदी आहे.

सरकारी-खासगी कार्यालयांबाबत आदेश

त्याचबरोबर सरकारी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना प्राध्यान्यानं लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच ज्या कार्यालयांतील कर्मचाऱ्यांचे शंभर टक्के लसीकरण पूर्ण झालं आहे. त्यांना पूर्ण क्षमतेनं कार्यालये सुरु करण्यात येतील. तसेच चोवीस तास खासगी कार्यालये सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. एकाच वेळी गर्दी करण्यापेक्षा तीन शिफ्टमध्ये खासगी कार्यालये सुरु ठेवता येतील.

इनडोअर गेम्सना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने राज्यात एकूण १३०० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादित होतो. पीएसए प्लान्टसाठी साडेचारशे ऑर्डर देण्यात आल्या आहेत. त्यांपैकी १४१ प्लान्टला आजपासून प्रत्यक्षात सुरुवात झाली. याचा पूर्ण क्षमतेनं वापर झाला तर १७०० ते २००० मेट्रिक टन ऑक्सिनज उत्पादित होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update: पुण्यात पावसाचा हाहाकार! एकता नगरमध्ये पाणी शिरलं, खडकवासल्यातून विसर्ग वाढला

Kolhapur Rain Update : पंचगंगा नदीने इशारा पातळी गाठली, जिल्ह्यातील ४१ मार्गांवर पाणी; राधानगरी धरणाचे ५ दरवाजे बंद, असा आहे पावसाचा अंदाज?

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, नाशिकमध्ये पूरस्थितीची शक्यता

SCROLL FOR NEXT