Unlock  sakal media
महाराष्ट्र बातम्या

हॉटेल्स आणि दुकाने उशीरा पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

मिलिंद तांबे

मुंबई : राज्यातील नाट्यगृह (Theaters), चित्रपट गृह (Multiplex) सुरू करण्यास परवानगी (permission) दिल्या नंतर आता हॉटेल्स आणि दुकाने (shops and hotels) रात्री उशिरा पर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे. मात्र मुंबईत नियमांची कठोर अंमलबजावणी (corona rules) केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याच पालिका आयुक्त इकबालसिंह चहल (iqbal singh chahal) यांनी म्हटले आहे.

राज्यासह मुंबईतील हॉटेल्स रात्री 12 तर दुकाने 11 पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या काही दिवस सणांचे आहेत. हे सणांचे दिवस लक्षात घेता हे निर्णय घेण्यात आले आहेत. सणांच्या दिवसात हॉटेल्स, रेस्टॉरंट मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते मात्र ही गर्दी होऊ नये यासाठी दुकाने, हॉटेल्स, रेस्टॉरंट यांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. त्यानुसार हॉटेल्स रात्री 12 तर दुकाने रात्री 11 पर्यंत सुरू राहणार आहेत.

तर उपाहारगृहे आणि दुकाने जास्त वेळ सुरू ठेवण्याची मागणी होत होती. त्यानुसार त्यांच्या वेळा वाढवण्यात आल्या असून यासोबतच त्यासंदर्भातील कार्यपद्धती आणि मार्गदर्शक सूचना जाही करण्यात आल्या आहेत.तर पालिकेने देखील मुंबईतील दुकाने, रेस्टॉरंट यांच्यासाठी सूचना जाहीर केल्या आहेत. या सगळ्या नियमांमध्ये सूट मिळाली असेल तरी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. अन्यथा कारवाई करण्याचा इशारा देखील दिला आहे.

-रेस्टॉरंट, हॉटेल्स, रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

-दुकाने रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी

-दुकान, रेस्टॉरंटमधील नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस घेतलेले आवश्यक आहे

-फेस मास्क-सॅनिटायझरचा वापरही अनिवार्य आहे

-गर्दीचे नियंत्रण आवश्यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT