Corona Vaccination
Corona Vaccination sakal media
महाराष्ट्र

राज्यात एक कोटींहून अधिक नागरिकांची लसीकरणाकडे पाठ; दुसरा डोस बाकी

भाग्यश्री भुवड

मुंबई : राज्यात पहिल्या डोसमधील (corona vaccination first dose) अंतर पूर्ण करुनही अद्याप दुसरा डोस घेण्यासाठी (second dose) लसीकरण केंद्रांवर (corona vaccination drive) न पोहोचलेल्या नागरिकांची संख्या एक कोटींच्या (more than one crore people) पुढे गेली आहे. राज्यात आतापर्यंत पात्र लोकसंख्येपैकी 87% नागरिकांना किमान पहिला डोस मिळाला आहे तर, दुसरा डोस 55 टक्के नागरिकांना मिळाले आहे. (More than one crore people did not take vaccination second dose in Maharashtra)

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, असे दिसून आले आहे की राज्यातील जवळपास 92 लाख नागरिकांनी  कोविशील्ड लस घेतली आणि 13 लाखांहून अधिक नागरिकांनी कोवॅक्सिन लस घेतली आहे. त्यामुळे, किमान 1 कोटींहून अधिक नागरिक आता दुसऱ्या डोस शिल्लक आहेत. मुंबई हा एकमेव जिल्हा आहे जिथे दुसरा डोस 80 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. दरम्यान, अजूनही मुंबईतील सात लाखांहून अधिक लोक आहेत ज्यांनी दुसरा डोस अंतर पूर्ण होऊनही घेतलेला नाही.

सध्या कोरोनाच्या वाढत्या सक्रिय रुग्णांसह ओमायक्राॅनचे रुग्ण ही राज्यात वाढत आहेत.  त्यामुळे, तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जास्तीत जास्त  लसीकरण रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि मृत्यू रोखण्यासाठी सर्वात प्रभावी शस्त्र आहे. राज्य अहवालावरून असे दिसून आले आहे की, पुण्यात (11.6 लाख) त्यानंतर, मुंबईत (6.5 लाख)  सर्वाधिक नागरिक आहेत ज्यांनी कोविशील्डचा दुसरा डोस घेतला नाही. त्यापाठोपाठ नाशिक (5.5 लाख), कोल्हापूर (5.4 लाख) आणि ठाणे (5.3 लाख) सर्वाधिक नागरिक दुसऱ्या डोससाठी बाकी आहेत.

कोवॅक्सिनच्या बाबतीत, बुलढाणा जिल्ह्यात (1.2 लाख) नागरिक दुसऱ्या डोससाठी सर्वाधिक बाकी आहेत. लसीकरण करुन न घेण्याची बरीचशी कारणे आहेत, त्यापैकी एक म्हणजे लसीबाबत उदासीनता. यासह अद्याप लसीकरणाबातची संभ्रमता कायम आहे. तरीही वेगवेगळ्या उपाययोजना करुन लसीकरणाचा आकडा वाढावा यासाठी स्थानिक जिल्हा अधिकारी प्रयत्नशील आहेत असे एका राज्य अधिकाऱ्याने सांगितले.

लसीचा पूर्ण साठा लसीकरण केंद्रांवर आहे. पण, अनेक खासगी केंद्रांनी लसीकरण पूर्णपणे थांबवल्याचे समजत आहे. दरम्यान, मुंबईत दुसरा डोस चुकवलेल्या नागरिकांना बोलावण्याचे काम वॉर्ड वॉर रूमवर सोपवण्यात आले आहे. ते त्यांना संपर्क करुन दुसरा डोस का नाही घेतला याची विचारपूस करत आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, ज्यांना दिवसा डोस घेण्यास शक्य होत  नाही अशा लोकांसाठी त्यांनी संध्याकाळची लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत.

"प्रत्येक प्रभागात आता एक केंद्र आहे जे रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असते आणि लोकांनी त्यांचा लाभ घ्यावा. यासह वाॅर्ड वाॅर रुमकडूनही नागरिकांना त्यांच्या दुसऱ्या डोसविषयी विचारणा केली जात आहे. दरम्यान, पहिला डोस राहिलेल्या लाभार्थ्यांच्या यादीतून मुंबईला वगळण्यात आले आहे. कारण, मुंबईतील पहिला डोसचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून 106 टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.

पहिला डोस राहिलेल्यांची संख्याही एक कोटींच्या वर

राज्यात मुंबई वगळता एक कोटींहून अधिक नागरिकांचा अद्याप पहिला डोसही झालेला नाही. ज्यात पहिल्या क्रमांकावर ठाणे जिल्हा असून 13.2 लाख नागरिकांचा यात समावेश आहे, त्यानंतर,  नाशिक(10.9) लाख, अहमदनगर (8.14) लाख, जळगावातील 8 लाख 9 हजार 697 नागरिकांनी लसीचा पहिला डोस अद्याप घेतलेला नसल्याची नोंद राज्याच्या अहवाल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT