Vaccination sakal media
महाराष्ट्र बातम्या

राज्याने केला 10 कोटी लसीकरणाचा टप्पा पार

भाग्यश्री भुवड

मुंबई : कोविड-19 लसीकरणात (corona vaccination) मंगळवारी राज्याने 100 दशलक्ष म्हणजेच 10 कोटीचा टप्पा पार (above ten crore vaccination) केला. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास (pradip vyas) यांनी या यशाचे श्रेय राज्यातील जिल्हा अधिकाऱ्यांना दिले. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 4,07,875 पात्र लाभार्थींना कोरोना विरूद्ध लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत 6,80,28,164 लोकांना पहिला डोस (vaccination first dose) मिळाला आहे तर 3,20,37,073 लोकांना दुसरा डोस (second dose) मिळाला आहे. महाराष्ट्रात आजपर्यंत एकूण 10,00,65,237 लसीकरण करण्यात आले आहे.

या कामगिरीबद्दल राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले, " ऑक्टोबर मध्ये भारताने 100 कोटी डोसचे लक्ष पूर्ण केले तेव्हा हा अभिमानाचा क्षण होता आज नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात, महाराष्ट्राने पात्र लाभार्थ्यांना 10 कोटी लसीचे डोस पूर्ण केले आहेत! निःसंशयपणे हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. राज्याने 6.8 कोटी लोकांना पहिला डोस यशस्वीपणे दिला आहे, आणि 3.2 कोटी पूर्णपणे लसीकरण केले आहे. हे यश राज्य आणि पालिका अधिकारी, प्रशासकीय संस्था, आरोग्यसेवा कर्मचारी, आणि जबाबदार नागरिकांच्या प्रचंड मेहनतीचे, धोरणात्मक कौशल्याचे फळ आहे.

सावधगिरी आणि कोविड 19 योग्य वर्तन न ठेवल्यास, प्रकरणे पुन्हा वाढतील. ख्रिसमस, नवीन वर्ष यासारखे सण लवकरच येत आहेत, सतर्क आणि सावध राहणेच महत्वपूर्ण आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील सर्व नागरिकांना किमान पहिला डोस मिळावा असे निर्देश दिले होते. राज्यात कोविडचे प्रमाण कमी झाले असले तरी मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला. संसर्गाचे प्रमाण कमी असले तरी चाचणीची संख्या कमी नसावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, स्थानिक अधिकाऱ्यांनी लसीकरण मोहिमेत मोठा सहभाग घेतला.  त्यामुळे हे शक्य झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT