Narhari Sitaram Zirwal  esakal
महाराष्ट्र बातम्या

नागपूरमध्ये सरकारी बंगल्यांवर अजुनही मविआचं राज्य; नावाच्या पाट्याच बदलेल्या नाहीत

शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन महिन्याहून अधिक काळ उलटला

रुपेश नामदास

Narhari Sitaram Zirwal: राज्यात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन होऊन तीन महिन्याहून अधिक काळ उलटला आहे. मात्र शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप रखडलेला आहे. मागील अनेक दिवसांपासून मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार अशी चर्चा होती. आता मंत्रीमंडळाच्या विस्ताराची तारीख ठरली आहे.

अधिवेशनाआधी मंत्रीमंडळ विस्तार आणि महामंडळांच्या वाटपासाठी आमदारांचा दबाव होता. त्यामुळे आता १३ डिसेंबर रोजी मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात आज बैठक होणार आहे. या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तार आणि महामंडळांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

दरम्यान शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन तीन महिन्याहून अधिक काळ उलटला असला तरी अजूव ही मविआ सरकार मधील माजी मंत्र्यांची नावे सरकारी बंगल्यांवर अजून तशीच आहेत. हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे. हे अधिवेशन 19 डिसेंबर रोजी सुरू होणार होईल. मात्र अधिवेशन अगोदरच नवी चर्चा चालू झाली आहे.

सध्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत. मात्र नवे सरकार येवून देखील नागपूर विधान भवनात काही बंगल्यांवर आणि चेंबरमधील जुन्या सरकारमधील नेत्यांच्या नावाच्या पाट्या काढल्या नाहीत. मागील सरकार मधील तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या नावाची पाटी अजून देखील काढली नाही. त्यामुळे चर्चांना उधान आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT