MLA 
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha 2019 : काठावर पास होणाऱ्या आमदारांच्या संख्येत घट

श्रीमंत माने

पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्‍याचे ३७ जण विजयी; सर्वाधिक आमदार भाजपचे
नाशिक - राज्याच्या विधानसभेत यंदा पाच हजारांपेक्षा कमी मतांनी म्हणजे काठावर विजयी होणाऱ्या आमदारांची संख्या २०१४ च्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सगळे प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर लढल्यामुळे गेल्या वेळी तब्बल ५५ म्हणजे १९ टक्‍के आमदार पाच हजारांपेक्षा कमी फरकाने विजयी झाले होते. यंदा ही संख्या ३७ पर्यंत खाली आली आहे.

विशेष म्हणजे, तेराव्या विधानसभेतील अशा ५५ आमदारांपैकी तब्बल ३४ आमदार चौदाव्या विधानसभेत दिसणार नाहीत. भाजप व शिवसेना युती करून, तर दोन्ही काँग्रेस आघाडी बनवून रिंगणात उतरल्या होत्या.

परिणामी, काठावरच्या अनेकांचा पराभव झाला. काही जण पुन्हा रिंगणातच उतरले नाहीत, तर तिकीट नाकारलेल्या काहींनी अपक्ष बनून जनमताचा कौल मागितला. परंतु, मतदारांनी त्यांना नाकारले. विशेष म्हणजे, गेल्या वेळी काठावर निवडून आलेले सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे बहुतेक आमदार पुन्हा निवडून येताना मात्र अधिक मोठ्या मताधिक्‍याने निवडून आले आहेत. सत्तेचा फायदा वाढीव जनमत मिळविण्यासाठी त्यांना झाला.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे (फुलंब्री) आणि डॉ. संजय कुटे (जळगाव जामोद) व बबनराव लोणीकर (परतूर), अतुल सावे (औरंगाबाद पूर्व), विद्या ठाकूर (गोरेगाव) हे मावळत्या सरकारमधील मंत्री, तसेच रणधीर सावरकर (अकोला पूर्व), लखन मलिक (वाशीम), राजेंद्र पाटणी (कारंजा लाड), महेश चौघुले (भिवंडी पश्‍चिम), मंदा म्हात्रे (बेलापूर), कॅप्टन आर. तमिळसेल्वम (सायन कोळीवाडा) या भाजपच्या आमदारांचा वाढीव मताधिक्‍यासाठी सत्तेचा लाभ मिळालेल्यांमध्ये समावेश आहे. यवतमाळमधून मदन येरावार यांना मात्र पुन्हा निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर (वडाळा) व अपक्ष गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) हे या वेळी भाजपच्या तिकिटावर लढले आणि विजयी झाले. उदेसिंग पाडवी (शहादा), प्रभुदास भिलावेकर (मेळघाट), विष्णू सवरा (विक्रमगड) व नरेंद्र पवार (कल्याण पश्‍चिम) यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये हिंसक आंदोलन! राष्ट्रपती-पंतप्रधानांसह मोठ्या नेत्यांचा राजीनामा, पण ज्यांच्या आदेशाने देश पेटला ते सुदान गुरुंग कोण?

Pali News : पाली नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार! महायुतीमध्येच कुरघोडी व चढाओढ, भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये थेट लढत

Nepal President Resigns : मोठी बातमी! नेपाळमध्ये पंतप्रधानांपाठोपाठ आता राष्ट्रपतींनीही दिला राजीनामा

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

SCROLL FOR NEXT