esakal
महाराष्ट्र बातम्या

Water Scarcity: टंचाई कृती आराखडा अंतिम टप्प्यात, डिसेंबरअखेर टँकरची संख्या वाढण्याची शक्यता

जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस झालेला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पाणी टंचाई जाणवत आहे. ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात ९४ पाण्याचे टँकर सुरू झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

Water Scarcity in Maharashtra: जिल्ह्यात यावर्षी कमी पाऊस झालेला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पाणी टंचाई जाणवत आहे. ऐन पावसाळ्यात जिल्ह्यात ९४ पाण्याचे टँकर सुरू झाले होते. परतीच्या पावसामुळे ही संख्या घटली आहे. डिसेंबरअखेर अनेक तालुक्यात पाण्याचे टँकर सुरू होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या वतीने जून २०२४ पर्यंत टंचाईत कृती आराखडा अंतिम टप्प्यात आहे. येत्या आठ दिवसात हा आरखडा अंतिम होणार आहे.

केंद्र शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात जलजीवन मिशन योजना राबवण्यात येत आहेत. या योजनेतील शंभर नळ पाणी पुरवठा योजना डिसेंबरअखेर कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. टंचाईवर मात करण्यासाठी या योजनांचा हातभार लागणार आहे.

गेल्यावर्षी दमदार पावसामुळे जिल्ह्यात साडेसहा कोटी रुपयांचा टंचाईकृती आरखाडा तयार करण्यात आला होता. जिल्ह्यातील प्रत्येक गावाच्या मागणीनुसार उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुढील सहा ते सात महिन्यांचा टंचाई कृती आराखडा तयार करीत असते. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने हा आरखडा मंजूर करण्यात येतो. आराखड्यात सरकारी पाण्याचे टँकरची संख्या तालुकानिहाय निश्‍चित करण्यात आलेली असते. या पाण्याच्या टँकरवर किती खर्च अपेक्षित असून त्यानुसार नियोजन करण्यात येते.

त्याचबरोबर तात्पुरत्या नळ पाणी योजना, खासगी विहिरी पाण्यासाठी अधिगृहीत करणे, नविन विंधनविहीरी, सरकारी विहिरीतून गाळ काढणे या उपाययोजनांचा टंचाई कृती आरखड्यात समावेश असतो. यासाठी प्रत्येक गावातील ग्रामसभेच्या मागणीनुसार उन्हाळ्यात अथवा उन्हाळ्याच्या शेवटी निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईनुसार पाण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे नोंदवत असते. जिल्ह्याचा पुढील ता.३० जूनपर्यंतच्या टंचाई कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे.(Latest Marathi News)

सहा तालुक्यातून टँकरची मागणी

जिल्ह्यातील १४ पैकी ६ तालुक्यांची मागणी आलेली असून येत्या आठ दिवसात हा आरखडा अंतिम होणार आहे. त्यापूर्वीच मागील आठवड्यात पाथर्डी तालुक्यात पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत.

डोंगराळ भागात टंचाईची तीव्रता

जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यात पाणी टंचाई जास्त जाणवते. पाथर्डी, नगर, पारनेर या तालुक्यात टँकरची संख्या जास्त असते. जिल्ह्यात उत्तर भागात संगमनेर तालुक्यात पाण्याच्या टँकरची मागणी वाढणार असल्याचा अंदाज आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्मृतीच्या वडिलांनंतर पलाश मुच्छलचीही प्रकृती बिघडली, रुग्णालयात घेतले उपचार

सांगलीत ड्रंक अँड ड्राइव्हचा थरार! राँग साइडने चालवली स्कोडा, ६-७ वाहनांना धडक; अनेकजण जखमी

दुर्दैवी घटना! 'शेतीत मशागत करताना रोटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा मृत्यू'; कागल तालुक्यातील घटना, अचानक तोल गेला अन्..

CM Eknath Shinde: आमचा शत्रू फक्त महाविकास आघाडीच: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; स्थानिकमध्ये एकमेकांविरुद्ध लढलो म्हणजे शत्रू नाही

Crime News : पुण्यात घरफोडी करणारी तरुणींची टोळी, विदर्भातून सहा जणींना घेतलं ताब्यात; VIDEO झालेला व्हायरल

SCROLL FOR NEXT