Maharashtra Rain Updates Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Updates: राज्याला पाऊस झोडपणार! जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

Maharashtra Weather And Rain Updates: २८ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पावसाळी वातावरण, ढगाळ हवामानामुळे राज्यातील उन्हाचा चटका कमी झाला आहे.

आशुतोष मसगौंडे

मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने दणका दिला आहे. आज (ता. २७) कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.

२८ सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पावसाळी वातावरण, ढगाळ हवामानामुळे राज्यातील उन्हाचा चटका कमी झाला आहे.

गुरुवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात उकाडा कायम असून, दुपारनंतर जोरदार वादळी वारे, विजांसह वळीव स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे.

कोकणातील पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे. उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे.

देशात काय परिस्थिती?

  1. उत्तर प्रदेश, बिहार आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये गडगडात आणि वादळासाठी मुसळधार ते अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

  2. गुजरातमध्ये, विशेषत: दक्षिण गुजरातमध्ये जोरदार पाऊस आणि वादळे अपेक्षित आहेत, जेथे जोरदार ते अत्यंत जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे.

  3. ईशान्य भारत आणि उत्तर मैदानी भागातही पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे.

  4. पश्चिम राजस्थान वगळता इतरत्र विखुरलेला पाऊस आणि वादळे अपेक्षित आहेत, जेथे कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियस पर्यंत पोहोचू शकते. पश्चिम लडाखमध्ये एकाकी हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : : खरीप हंगामात डीएपी या रासायनिक खताची टंचाई; पावसामुळे मशागतीची कामे ठप्प

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT