Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: उद्यापासून राज्यात पाऊस पडणार?, 24 जूनपासून मुसळधार पाऊस; IMDने दिली अपडेट

हवामान विभागाकडून उद्यापासून राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या वातावरणात सातत्याने बदल होताना दिसुन येत आहेत. राज्यातील काही भागामध्ये उष्णतेचा तडाखा जाणावत आहे तर काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार उद्यापासून (23 जून) राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

कोकणातील काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता आहे.(Latest Marathi News)

मान्सून लांबल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. बळीराजा समोर मोठं संकट उभं राहील आहे. मात्र, उद्यापासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हा बळीराजासाठी मोठा दिलासा असणार आहे.(Latest Marathi News)

पुढील 4 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली आहे. उद्या 22 जूनला मुंबईत मध्यम तर 23-24 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

राज्यातील जवळपास सर्व भागांमध्ये येत्या 3 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 23-24 जूनला विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर, 24 जूनला कोकणातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र हलक्या सरींचा अंदाज आहे.(Latest Marathi News)

पुण्यातही पुढील २ ते ३ दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये येत्या 3 दिवसात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर 23-24 जूनला विदर्भात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : कांदिवलीत डंपरची स्कूटीला धडक; थरारक अपघातात दुचाकी चालक बचावला

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT