maharashtra weather update weather conditions across the state for five days Maharashtra rain update  sakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update : भर उन्हाळ्यात पावसाचे सावट! हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

रोहित कणसे

Maharashtra Weather Update : राज्यात दिवासा उन्हाच्या झळा बसत असताना हवामान खात्याने पुन्हा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने पुढील तीन दिवसांसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान अवकाळी पावसाच्या शक्यतेमुळे शेतकरी राजा पुन्हा चिंतेत पडला आहे.

राज्यात विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवन्यात आली आहे. या जिल्ह्यांना ७ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यांमध्ये ६ एप्रिल रोजी अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच ७ एप्रिल रोजी विदर्भातील गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

विदर्भासोबतच पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ६ एप्रिल म्हणजे आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये राहणारे शेतकरी तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांनी आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT