Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: शेतकऱ्यांची चिंता वाढणार? आजपासून राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज

पिकांच्या सुरक्षेबाबत कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

सकाळ डिजिटल टीम

राज्यातील तापमानात सातत्याने चढ उतार होताना दिसत आहे. राज्यात कुठे उन्हाचा तडाखा जाणवत आहे तर कुठे ढगाळ वातावरण झाले आहे. अशातच, हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आजपासून म्हणजे 12 ते 15 मार्च दरम्यान राज्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे शेतकरी वर्गाची चिंता पुन्हा वाढणार आहे. पावसाची शक्यता असल्यामुळे हरभरा, गहू आणि इतर रब्बी पिके पक्वता अवस्थेत असलेल्या पिकांची काढणी करुन सुरक्षित ठिकाणी ठेवावीत असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.

मागील काही दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. सध्या पश्‍चिमेकडून येणारे बाष्पयुक्त वारे, तसेच वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर प्रदेश, विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे शहरात आणि ग्रामीण परिसरात पावसासाठी योग्य वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे शहरात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातही पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार आणि धुळे जिल्ह्यात 13 ते 15 मार्च दरम्यान हवामान ढगाळ राहील. तर तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडुन वर्तवण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी पुण्यासह ग्रामीण भागात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. विजांच्या कडकडाटासह, वादळी वारे देखील होते. दोन दिवसापासून संध्याकाळच्यावेळी पुण्यात ढगाळ वातावरण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT