Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update: राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update: राज्याच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपीटीचा आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या काही भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपीटीचा आणि अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. अशातच हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसासह गारपीटीचा अंदाज वर्तवला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये यलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

आज नागपूर, अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे. तर याशिवाय इतर अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर अकोला, वाशिम, हिंगोली, नांदेड, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असून विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.

पुढील तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने बळीराजाच्या उरात पुन्हा एकदा धडकी भरली आहे. दोन महिन्यात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांची पीके मातीमोल झाली आहेत. हा अवकाळी पाऊस संपूर्ण विदर्भात नसला तरी नागपूरसह, वाशीम, यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांना फटका बसला आहे.

नागपूर जिल्ह्यात शनिवारी, रविवारी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सावनेर, भिवापूर, उमरेड, मौदा तालुक्यात गारपीट झाली. अनेकांच्या घरावरील छत उडाल्याचे दिसून आले. तर गहू, हरभरा पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून मदत जाहीर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील ९५ गावांत गारपीट

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी (ता.१७) रात्री व मध्यरात्रीनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली. वाऱ्यामुळे झाडे उन्मळून विजेच्या तारांवर पडली. घरावरचे छप्पर उडून गेले. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विद्युत तारांवर झाडे पडल्याने अनेक गावांतील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत बंद झालेला होता. आर्णी तालुक्यातील २५, मारेगाव २३, उमरखेड २७ तर दारव्हा तालुक्यातील २१ अशा ९५ गावांत गारपीट झाली आहे. वीज कोसळून १२ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात तब्बल १३२ घरांना वादळी वाऱ्यासह गारपिटीची फटका बसला आहे. आर्णी तालुक्यातील सर्वाधिक १२१ घरांना फटका बसला आहे.

वाऱ्यामुळे वृक्ष कोलमडली

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कारंजा तालुक्यात अवकाळी पाऊस वादळी वारा व गारपिटीमुळे १२८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. ते पंचनामे पूर्ण होते की नाही तोच तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. यावेळी वादळी वाऱ्यामुळे काही वृक्ष रस्त्यावर कोलमडून पडले तर पावसामुळे रब्बी हंगामात उशिरा पेरणी केलेल्या गहू हरभरा व भाजीपाला या पिकांसह फळबागांचे देखील काही प्रमाणात नुकसान झाले. रविवारी दुपारी अचानक पावसाळी वातावरण तयार झाले आणि दुपारी ४ वाजता कारंजा शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कारंजा अमरावती मार्गावरील भीलखेडा परिसरात एक बाभळीचे झाड रस्त्यावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती.

गोंदियात वादळवाऱ्यासह पावसाची हजेरी

सोमवारी सकाळपासून कडाक्याचे ऊन तापत असताना जिल्ह्याच्या बहुतांश भागात सायंकाळी पाच ते सहानंतर वादळवाऱ्यासह तुरळक पावसाने हजेरी लावली. गोंदिया शहरात सोसाट्याचा वारा वाहू लागला. विद्युत पुरवठा तासभर खंडीत झाला होता. पावसानेही हजेरी लावली. आमगाव येथे जोराचा वारा सुटला. दीड तास वीज पुरवठा खंडित होता. सडक अर्जुनी परिसरात पाऊस नाही. परंतु, पावसाचे वातावरण होते. सालेकसा येथेही वादळवारा सुटला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे पोलिसांकडून गुन्हेगारी टोळ्यांचे होणार “आर्थिक ऑडिट”... आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणार

Kolhapur News : पालकमंत्री आबिटकरांनी झापल्यानंतर महापालिकेतील अनेक अधिकाऱ्यांना नोटीस, तर कनिष्ठ अभियंता निलंबित

Nagpur : नागपुरात मेंदूज्वर सदृश्य आजाराचा धोका, आतापर्यंत १० बालकांचा मृत्यू

Fastag : फास्टॅग नाही किंवा पुरेसा बॅलन्स नाही, काळजी करू नका; UPI द्वारे देऊ शकता टोलचे पैसे  

Cough Syrup Warning : डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या कफ सिरप, बालकांच्या मृत्यूनंतर सूचना; सर्दी, खोकल्‍याची औषधे बालकांना देऊ नका

SCROLL FOR NEXT