rain
rain sakal
महाराष्ट्र

महाराष्ट्रात दोन दिवस गडगडाटासह पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

सकाळ डिजिटल टीम

किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक प्रदेशात वादळी पाऊसाने एंट्री केली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. दरम्यान, आता येत्या दोन दिवस राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. (Maharashtra Weather Update)

21 ते 23 एप्रिलला काही ठिकाणी हलका किंवा गडगडाट पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (Maharashtra Rain Forecast)

महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21 ते 24 एप्रिल दरम्यान तुरळक पण विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. वातावरणातील बदलांमुळे आणि वादळी वाऱ्याच्या इशाऱ्याने कोकणतील आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. या कालावधीत नागरिकांनी बाहेर जाण्यासाठी प्रशासनाने खबरदारी बाळगण्याचे आवाहन केलं आहे.

दरम्यान, वादळाच्या प्रभावामुळे समुद्र खवळलेला असून गुरुवारपर्यंत तो खवळलेलाच राहणार आहे. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात मागील काही दिवसांत हालक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. यात कोकणाचा आणि पश्चिम महाराष्ट्रासह काही प्रदेशांचा समावेश आहे. ऐन कडक उन्हाळ्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या अंदाजानुसार राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पाऊसाच्या हलक्या सरी सुरु आहेत. प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात वीजांच्या गडगडाटासहीत काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT