winter sakal media
महाराष्ट्र बातम्या

पुढील 24 तासांत थंडीची लाट; महाराष्ट्रही गारठणार

येत्या काही तासांत वातावरण आणखी थंड होण्याची शक्यता आहे.

सकाळ डिजिटल टीम

येत्या काही तासांत वातावरण आणखी थंड होण्याची शक्यता आहे.

देशाच्या उत्तरेकडील काही राज्यात थंडीची लाट तीव्र झाल्याने राज्यातील तापमानात घट झाली आहे. पारा 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली असल्याने राज्यातील काही प्रदेशात हुडहुडी भरली आहे. दरम्यान, देशातील अनेक राज्यात थंडीच्या वातावरणात वाढ होत आहे. पुढील २४ तासांत देशातील उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, सौराष्ट्र आणि कच्छ, तेलंगणा, बिहार, झारखंड, गंगेच्या पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे येत्या काही तासांत वातावरणात आणखी थंड होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, गेले काही दिवस राज्यातील काही प्रदेशात थंडीचा पारा वाढला आहे. विदर्भात अंगाला झोंबणारा गारवा निर्माण झाला आहे. 22 डिसेंबरपासून पुन्हा तापमानात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भात थंडीची लाट आली असून, बहुतेक भागातील तापमानाचा पारा 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. तसेच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही काही भागात रात्रीच्या किमान तापमानात मोठी घट झाली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, "पुढील २४ तासांत पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्ये तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या २४ तासांत काहीच भागात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे." तर देशामध्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि झारखंडच्या भागांमध्ये बुधवारी दुपारपर्यंत थंडीची लाट, आणि जम्मू, काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, गंगा पश्चिम बंगालमध्ये मंगळवारी दुपारपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

पुढील तीन दिवस मध्य आणि पूर्व भारतात थंडीची लाट राहील आणि त्यानंतर या थंड तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रतही (Maharashtra) मंगळवारी दुपारपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT