rain e sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यात २२ ऑगस्टपासून पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस तीन दिवसांपासून सक्रीय झाला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी देखील लावली. मात्र, आता राज्यात 22 ऑगस्ट म्हणजेच उद्यापासून पावसाचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविला आहे.

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने खंड दिला होता. यामुळे खरिपातील पिकांची वाढ खुंटली होती, तर हलक्या जमिनीतील पिके माना टाकून सुकुन गेले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. शेतीतील आंतरमशागतीची कामे पूर्ण करून शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले होते. पाऊस नसल्याने तो चिंतेत होता. गेल्या आठ दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली होती. अंगाची लाही-लाही होत होती. पण, गेल्या चार दिवसांपासून पाऊस आणखी सक्रीय झाला होता. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला. तसेच नदी-नाल्यांना पूर देखील आला होता. मात्र, आता उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

यंदा 'या' भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस

आतापर्यंत राज्यातील नंदुरबार, अमरावती, गोंदिया, गडचिरोली या भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तसेच अन्य भागात सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडला असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्याच्या मुलीला वसतीगृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांकडे कूलरबाबत केलेल्या तक्रारीच्या रागातून कारवाई

Ebola Alert in India: इबोला फैलावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा निर्णय; विमानतळांवर आफ्रिकन प्रवाशांसाठी कडक आरोग्य तपासणी लागू

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील अभंग प्रभू अकॅडमीमधील शिक्षक तेजस शहा याला सीबीआयकडून अटक

Taj Mahal History: ताजमहाल फक्त मुघलांचा की इराणचाही? अमेरिकी परराष्ट्र मंत्र्यांच्या आग्रा दौऱ्याने उकरून काढला ५०० वर्षे जुना इतिहास

Gokul Election 2026 : महाडिक, मुश्रीफ, कोरे, आबिटकर विरूद्ध सतेज पाटील लढणार गोकुळ निवडणूक?; सात संचालकांचा पाठिंबा, नव्या आघाडीची घोषणा

SCROLL FOR NEXT