महाराष्ट्र बातम्या

ठाकरे सरकारची बदनामी; एसटी कर्मचारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा

राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात आणि कॅबिनेट मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सोशल मीडियावर लिहिनं एका एसटी कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर पाहून त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्याचं नाव प्रविण ज्ञानेश्वर लढी असं आहे. तो यवतमाळ आगारात कार्यरत होता.

यवतमाळ आगारातील एस. एस राठोड यांनी दिलेल्या अहवालानंतर लढी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. परिवानह मंत्री अनिल परब आणि महाविकास आघाडी सरकार विरोधात ज्ञानेश्वर लढी यांनी व्हॅट्स अॅप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. यामध्ये लढी यांनी म्हटले होते की, 'महा वसुली खंडणीखोर चोरटोळी अंबानीच्या घराशेजारी स्पोटके ठेवलायला ड्रायव्हर मिळाला. ऑक्सीजन टँकरसाठी ड्रायल्हर मिळत नाही. 100 कोटी वसुली सरकार.'

तपासांमध्ये सहकार्य करत नसल्यचा ठपकाही लढी यांच्यावर ठेवण्यात आली आहे. 20 जुलै 2021 पासून लढी यांचं एसटीमधून निलंबन करण्यात आलं आहे. या कालावधीत त्यांना नियमांप्रमाणे निवार्ह भत्ता दिला जाणार आहे. तसेच निलंबन कालावधीत लढी यांनी यवतमाळ आगारामध्ये दररोज हजेरी लावावी, असेही अद्यदेशात म्हटलेय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT