ashish shelar sakal
महाराष्ट्र बातम्या

१ मे रोजी मविआ सरकारला देणार 'डोस'; भाजपामध्ये शिजतंय काय? ट्विटची चर्चा

भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या ट्विटमुळे आता चर्चांना उधाण आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचं महाविकास आघाडी(MahaVikas Aghadi Government) सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधातली भारतीय जनता पार्टी सरकारवर सातत्याने टीकास्त्र सोडत आहे. सत्ताधारी पक्षांमधल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणं, सरकारच्या धोरणांवर टीका करणं ही मोहीमच भाजपाने राबवली आहे. आता या मोहिमेमध्ये आणखी एका मोठ्या घडामोडीची भर पडण्याचे संकेत भाजपा आमदार आशिष शेलार(Ashish Shelar Tweet) यांच्या ट्विटमधून मिळत आहेत.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचं महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधातली भारतीय जनता पार्टी सरकारवर सातत्याने टीकास्त्र सोडत आहे. सत्ताधारी पक्षांमधल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणं, सरकारच्या धोरणांवर टीका करणं ही मोहीमच भाजपाने राबवली आहे. आता या मोहिमेमध्ये आणखी एका मोठ्या घडामोडीची भर पडण्याचे संकेत भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या ट्विटमधून मिळत आहेत.

देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी महाविकास आघाडी सरकारला "बुस्टर डोस" देणार असल्याचं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमधून सांगितलं आहे. ते म्हणतात, "कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याने जनतेने "बुस्टर डोस" वेळीच घेतला पाहिजे. केंद्र सरकारकडून येणाऱ्या सूचना पाळल्या पाहिजेत. बाकी राज्यातील आघाडी सरकारला जो "डोस" देण्याची गरज आहे त्याची तयारी आम्ही करतोय. महाराष्ट्र दिनी तिघाडीला हा "डोस" मिळेलच!

याच ट्विटमध्ये आशिष शेलार(Ashish Shelar) पुढे म्हणतात, "शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या...पावसाच्या तोंडावर मुंबईकरांना सोडून फरार झालेल्या, आम्ही हिशोब विचारतो म्हणून दगड मारणाऱ्या, दाऊदच्या संबंधात तुरुंगवासी मंत्र्यांचे "नवाब" करणाऱ्या सरकारला आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार "डोस" वेळ ठरली.. 1 मे संध्या. 5 वाजता!"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND 3rd ODI: रोहित शर्माचे ५० वे शतक! विराट कोहलीनेही ठोकली फिफ्टी; RO-KO ची मोठ्या विक्रमांना गवसणी

Ladki Bahin Yojana: महिलांसाठी लाडकी बहीण योजनेत ई-केवायसी प्रक्रिया सुलभ करावी : इम्तियाज जलील

Marathwada Rain: मराठवाड्यात बरसल्या सरी; नांदेड, जालना परिसरात मुसळधार पाऊस

वर्ल्ड कपसाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची छेडछाड, आरोपीला अटक; नेमकं काय घडलं?

Government Farmer Scheme: महत्त्वाची बातमी! ९७ हजार शेतकऱ्यांना मिळाले ११२ कोटी; आठवड्यात ७ लाख ६४ हजार शेतकऱ्यांच्‍या खात्‍यात जमा होतील ८६७ कोटी रुपये

SCROLL FOR NEXT