MVA Mumbai Morcha Esakal
महाराष्ट्र बातम्या

MVA Mumbai Morcha : मुंबईत आज महाविकास आघाडीचा महामोर्चा; शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी

महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडीच्यावतीने आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील भायखळ्यातील रिचर्ड सन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली असली तरी राजकीय वातावरण पाहता महाविकास आघाडीच्या महामोर्चासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. भाजपही मविआच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा मोर्चा पार पडणार आहे.

रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असुन मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली आहे.

या महामोर्चामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गचाकडुन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे, अरविंद सावंत आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. तर राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षातील काही नेते उपस्थित असणार आहेत. तसेच, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि इतर नेते उपस्थित असणार आहेत. याशिवाय, मविआच्या मोर्चाला डाव्या पक्षांचा देखील पाठिंबा असणार आहे.

मोर्चामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल

रिचर्डसन क्रुडास मिल, जे. जे. मार्ग उड्डाणपूल, डॉ. दादाभाई नौरोजी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, टाइम्स ऑफ इंडिया या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. मध्य मुंबईतून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भायखळा येथून नागपाडा जंक्शनमार्गे मुंबई सेंट्रल येथून पुढे जाता येईल किंवा चिंचपोकळी, सातरस्ता मार्गे आग्रीपाडा, मुंबई सेंट्रल या रस्त्याने दक्षिण मुंबईकडे जाता येईल, अशी माहीती वाहतुक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. चार रस्ता, रफी अहमद किडवाई मार्ग, पी डिमेलो मार्गेही दक्षिण मुंबईत जाण्यासाठी मार्ग मोकळा असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT