महाविकास आघाडी
महाविकास आघाडी sakal
महाराष्ट्र

प्रभाग पद्धतीवरून आघाडीत धुसफुस : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महापालिकांसाठी बहुसदस्यीय म्हणजे तीन सदस्यांची प्रभाग पद्धत ठरविण्यावरून महाविकास आघाडीत धुसफुस सुरू झाली असून, या पद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त करत काँग्रेसने मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात ठराव केला आहे. मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी दोन सदस्यांचा प्रभाग हवा, असा आग्रह काँग्रेस नेत्यांनी धरला आहे.

राज्यातील महापालिकांसाठी चार सदस्यीय प्रभाग पद्धत रद्द करून त्याऐवजी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या निर्णयात कोणतेही राजकारण नसल्याचे सांगून मित्रपक्षांशी चर्चा करून प्रभागांचा ठराव केल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री जाहीर केले होते. त्यादरम्यान काँग्रेसच्या काही नेत्यांनी या पद्धतीला विरोध करीत, दोन सदस्यांची प्रभाग पद्धत योग्य असल्याकडे लक्ष वेधले होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील नव्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आज पार पडली.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा विरोध

बैठकीनंतर काही तासांत या प्रभाग पद्धतीला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी टिळक भवनात झालेल्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले आणि तीन सदस्यांचा प्रभाग नको, असे सांगत पदाधिकारी आक्रमक झाले. बहुतांशी नेते, पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर दोन सदस्यीय प्रभागांचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय झाला.

काँग्रेसच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आपली भूमिका मांडली आहे. मंत्रिमंडळाच्या आतापर्यंत झालेल्या निर्णयांबाबत अनेकदा फेरविचार झाला आहे. राज्य सरकारने यात फेरबदल केला नाही, तर कायदेशीर लढा देऊ.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : मनोज जरांगे अन् पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर; कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ; नेमकं काय घडलं?

IPL 2024, GT vs RCB Live Score: गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये मोठा धक्का! सलामीवीर स्वस्तात बाद

Nashik News : 10 वर्षानंतर धुळ झटकली; म्हाडा प्रकरणातील प्रस्ताव तपासण्याच्या सूचना

Latest Marathi News Live Update : माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा

Ulhasnagar Crime : मटका किंगच्या मुलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जेरबंद ; इन्स्टाग्राम पोस्टमुळे अडकला जाळ्यात

SCROLL FOR NEXT