Mahavikas Aghadi News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीलाच राहुल नकोसे? ‘वज्रमुठी’तून राहुल गांधी गायब? चर्चांना उधाण

सोनिया गांधी यांच्यापासून नाना पटोले यांच्यापर्यत सर्व आहेत, पण राहुल गांधी गायब

सकाळ डिजिटल टीम

Mahavikas Aghadi News: शिंदे-भाजप युतीला आव्हान देण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी वज्रमूठ आवळली आहे. राज्यभरात सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकण्याची पूर्ण तयारी महाविकास आघाडीने केली आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांना छत्रपती संभाजीनगरातून जोरदार सुरुवात होत आहे.(Latest Marathi News)

शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली या सभेची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. सभेसाठीचं टीझर देखील रिलीज करण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हा टीझर वेगाने शेअर केला जात आहे. मात्र टीझरमधील राहुल गांधींच्या गैरहजेरीने नव्याने चर्चा सुरु झाली आहे.(Marathi Tajya Batmya)

महाविकास आघाडीच्या संयुक्त सभेचा पहिला टीझर नुकताच जारी करण्यात आला आहे. सध्या ज्या शब्दावरून राजकारण पेटलंय, त्या चोर शब्दाचा खुबीने यात वापर करून घेण्यात आला आहे. ही जी माणसं जमलीयेत ती चोरून नेता येणार नाहीत, असं उद्धव ठाकरे यांचं भाषणातलं वाक्य वापरण्यात आलं आहे.

तर या टीझरमध्ये अजित पवार तसेच नाना पटोले देखील दाखवण्यात आले आहेत. महाविकास आघाडीची वज्रमूठ आवळली असून विराट संख्येने या सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन या टीझरमधुन करण्यात आलं आहे. यानिमित्ताने कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलं जातं आहे.

महाविकास आघाडीतील शिवसेना(ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या घटकपक्षांतील बहुतांश नेत्यांचे फोटो व्हिडिओ या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहेत.

अखेरीस एकिकडे स्व. बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे, उद्धव ठाकरे, तर दुसरीकडे सोनिया गांधी, शरद पवार, अजित पवार, नाना पटोले यांची छायाचित्र दाखवण्यात आली आहेत. मात्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात बोलणाऱ्या राहुल गांधी यांनाच टीझरमधून वगळण्यात आलं असल्याचं यामधून दिसून येत आहे.

शिवसेनेची राहुल गांधींवरील नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिंदे-भाजप युती विरोधात लढताना हिंदुत्वाचा मुद्दा वापरताना मविआकडून पूर्ण खबरदारी बाळगली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधींना टीझरमधून वगळण्यात आल्याची चर्चा आहे.

2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरातील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे, अजित पवार तसेच नाना पटोले कुणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Tweet Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या फोटोसह संजय राऊतांचे खरमरीत ट्वीट, 'खेळ कायदेशीर मार्गानेच आटोपतोय...' राजकीय वातावरण तापलं

Pune Voter List: पुण्यात मतदार यादीत मोठी कपात! ११ लाख मतदार बेपत्ता, २ लाख मृत; प्रारूप यादी २४ ऑगस्टला

SIR चा फॉर्म मोबाईलवरून ऑनलाइन कसा भरायचा? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या; 17 ऑगस्ट शेवटची तारीख

Marathi News Live Updates : लिफ्टमध्ये लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपाल दोषी, मुंबई हायकोर्टाने दिला निकाल

Woman Gives Birth on Bike : महिलेने मोटारसायकलवरच दिला बाळाला जन्म, हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांचा आईच्या धैर्याला सलाम

SCROLL FOR NEXT