Congress MLA Bhai Jagtap Ratnagiri  esakal
महाराष्ट्र बातम्या

Loksabha Election : महाविकास आघाडी 48 जागा लढविणार, 'या' जागा ठरणार निर्णायक; काय म्हणाले आमदार जगताप?

हुकूमशाहीमुळे देशाची लोकशाही अडचणीत आली आहे. ती वाचविण्यासाठी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) लढाई सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

'राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये काँग्रेसने निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यात मला रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड मतदारसंघ देण्यात आला आहे.'

रत्नागिरी : हुकूमशाहीमुळे देशाची लोकशाही अडचणीत आली आहे. ती वाचविण्यासाठी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) लढाई सुरू आहे. राज्यातील ४८ जागा आम्ही लढणार असून जास्तीत जास्त जागा मिळविण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी सांगितले.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्या‍च्यांच्या बैठकीसाठी आलेल्या आमदार भाई जागताप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुका कदाचित मार्चमध्येच होण्याची चिन्हे आहेत. राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये काँग्रेसने निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यात मला रत्नागिरी-सिंधुदुर्ग व रायगड मतदारसंघ देण्यात आला आहे.

त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार काँग्रेसला काय करता येईल याचा आढावा घेण्यासाठी या बैठका आहेत. त्याची सुरुवात रत्नागिरीपासून करण्यात आली. या प्राथामिक बैठका आहेत. यात जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांचीच सध्या भेट घेत असल्याचे त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत याठिकाणी प्रतिनिधित्व करीत असून निवडून येत आहेत.

परंतु, आघाडी म्हणून काँग्रेसचा त्यांना कसा फायदा होईल याचा आढावा घेण्यात आला. विधानसभेला मुंबई वगळून ७२ जागा कोकणात निर्णायक असतात. ही वेळ आता युद्धाची आहे. कोकण या निवडणुकीत आपले निर्णायक मत दाखवून देईल असे त्यांनी सांगितले. आताचे राजकारण खालच्या पातळीचे व गढूळ झाले आहे. महाविकास आघाडी वेगळ्या पद्धतीने विचार करते, असे जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT