NIA continues its decade-long search for Sandip Dange and Ram Kalsangra, the prime accused in the 2008 Malegaon bomb blast case, who remain untraced.  esakal
महाराष्ट्र बातम्या

Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोटातील ते दोन ‘वाँन्टेड’ आरोपी आहेत तरी कोण?, ज्यांना 'NIA'ने 'बेपत्ता' ठरवलंय!

Malegaon blast two wanted accused : या दोन्ही आरोपींना कधीही अटक केली तर त्यांना खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.

Mayur Ratnaparkhe

Sandip Dange, Ram Kalsangra Wanted by NIA: मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आज(गुरुवार) निकाल देताना सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केले. यामध्ये भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा समावेश आहे. परंतु न्यायालयाने एनआयएला या प्रकरणात बेपत्ता असल्याचे सांगितले जात असलेल्या दोन्ही आरोपींची पुन्हा चौकशी करण्याचे आणि आरोपपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे ते दोन आरोपी नेमके कोण आहेत, याबाबत सर्वांना उत्सुकता निर्माण झाली होती.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित दोन जणांना राष्ट्रीय तपास संस्थेने अजूनही वाँन्टेड आरोपी म्हणून दाखवलेले आहे. तर  खटल्याला सामोरे जाणाऱ्या सात आरोपींना न्यायालयाने निर्दोष सोडल्यानंतरही, जर या दोन्ही आरोपींना कधीही अटक झाली तर त्यांना खटल्याला सामोरे जावे लागणार आहे.

हे दोन  मुख्य आरोपी म्हणजे संदीप डांगे आणि राम कलसांगरा आहेत. ज्यांना अजूनही आरोपी म्हणून दाखवले जात आहे आणि तपासकर्त्यांच्या मते, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहराच्या मध्यभागी असलेल्या भिकू चौकात शकील गुड्स ट्रान्सपोर्ट नावाच्या दुकानाबाहेर बॉम्ब बांधून दुचाकी उभा करणारे तेच होते.

मात्र डिसेंबर २०१६ मध्ये या प्रकरणात एक नवीन वळण आले होते, जेव्हा निलंबित पोलीस अधिकारी मेहबूब मुजावरने दावा केला होता की मालेगाव स्फोटातील दोन मुख्य आरोपी संदीप डांगे आणि राम कलसांगरा आता जिवंत नाहीत, परंतु पोलिस अधिकारी त्यांना अजूनही जिवंत असल्याचे सांगत आहेत. मुजावरने असा दावा केला होता की मालेगाव बॉम्बस्फोटातील दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी मारले आहे, परंतु त्यांना अजूनही अधिकृत नोंदींमध्ये 'बेपत्ता' म्हणून दाखवले आहे. हे दोन्ही आरोपी बेपत्ता नव्हते, तर डिसेंबर २००८ मध्येच एटीएसने त्यांना मारले होते.

मुजावर यांनी असाही दावा केला की जेव्हा साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक करण्यात आली, तेव्हा त्याच वेळी भोपाळमधून कलसांगरा आणि डांगे यांनाही एटीएसने पकडले होते. परंतु २६ नोव्हेंबर २००८ रोजी  दोघांचीही मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. एवढच नाहीतर त्यांनी सांगितले की दोघांनाही ठार मारण्यापूर्वी कालाचौकी येथील एटीएस कार्यालयात बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन संपविले जीवन

Maratha Reservation: १९९४ चा जीआर नेमका काय आहे? मराठा समाज आरक्षणाबाहेर राहिला, कारण...

Latest Marathi News Updates : गावातील रस्त्याना आले नदीचे स्वरूप

कोकणातलं तुम्हाला काय आवडलं? दिलीप प्रभावळकर म्हणाले, 'ते पाहून मीच चकीत झालो कारण...

BCCI ची अब्जावधींची कमाई होते तरी कशी? भारताच्या तुलनेत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड किती कमावतो पैसा, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT