Sharad Pawar Resigns Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Resigns: "खर्गेंनी शरद पवारांचा आदर्श घ्यावा", निलंबित काँग्रेस नेत्याचं विधान

निलंबित काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या अध्यक्षांवरच टीका केलीय

अंकिता खाणे (Ankita Khane)

Mallikarjun Kharge News: शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष्यांवरच टीका केली आहे.

'काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंनी पवारांचा आदर्श घेऊन राजीनामा द्यावा', असं आशिष देशमुख यांनी म्हंटलं आहे. तर पुन्हा एकदा त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही टीका केली आहे. संजय राऊत यांच्यावर इतक्या खालच्या भाषेत टीका करणं योग्य नाही असंही देखमुख म्हणाले आहेत.

काय म्हणालेत आशिष देशमुख?

शरद पवार यांनी चांगलं पाऊल उचललेलं आहे. तसंच मल्लिकार्जुन खर्गेंचा पक्षात अपमान होत असेल तर त्यांनी देखील या वयामद्धे पदमुक्त व्हावं. तरुण व्यक्तीला काँग्रेसच्या अध्यक्षांपदावर बसण्याची संधी द्यावी.

पक्षात काम करण्यासाठी त्यांना राहुल गांधी यांच्याकडून आदेश घ्यावे लागतात. त्यांनी पदावरून पायउतार व्हावं असं आशिष देशमुख यांनी म्हंटलं आहे.

संजय राऊत महाविकास आघाडी एकत्र राहण्यासाठी कायमच प्रयत्नशील असतात. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यासंबधी केलेलं वक्तव्य हे महाविकास आघाडीत फुट पडणार आहे. राऊतांवर इतक्या खालच्या भाषेत टीका करणं योग्य नाही असंही पुढे आशिष देशमुख म्हणाले आहेत.

वारंवार पक्षातील नेत्यांविरोधात विधान केल्याप्रकरणी आमदार आशिष देशमुख यांचं काँग्रेसमधून निलंबन करण्यात आलं आहे. नाशिकच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी काँग्रेसमध्ये झालेल्या गोंधळावरुन आशिष देशमुखांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात भूमिका घेतली होती.

त्यानंतर नाना पटोले यांनी केंद्रीय नेतृत्वाकडं देशमुख यांची तक्रारही केली होती. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर देशमुख यांनी राहुल गांधींना ओबीसी समाजाची माफी मागावी अशी सूचना केली होती. याची दाखल घेत पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT