Parbhani Accident News
Parbhani Accident News esakal
महाराष्ट्र

Parbhani Accident | पूर्णामध्ये स्कार्पिओ उलटून एकाचा मृत्यू, आठ जण जखमी

जगदीश जोगदंड

पूर्णा (जि.परभणी) : नऱ्हापूर (ता.पूर्णा) जवळ नांदेड-पूर्णा महामार्गावर भरधाव स्कार्पिओ गाडी उलटून एक जणाचा मृत्यू, तर आठ जण जखमी झाले आहेत. गुरुवारी (ता.दोन) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास स्कार्पिओ ही नांदेडकडून पूर्णेकडे (Purna) भरधाव वेगाने येत होती. याच दरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटून सदरील गाडीने चार कोलांट उड्या खाल्यानंतर सदरील गाडी रस्त्या मधोमध उलटली. या अपघातात गाडी चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड (Nanded) येथे हलविण्यात आले आहे. (Man Died In Accident, Eight Injured In Purna Taluka Of Parbhani)

इतर आठ जणांपैकी दोघांना गंभीर, तर बाकी सहा जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. गंभीरपैकी एकाचा नांदेड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती फौजदार पंडित यांनी दिली असून सर्व जखमींना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आल्याने संध्याकाळपर्यंत जखमी व मृत्यू झालेल्यांची नावे समजू शकली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. घटनास्थळी चुडावा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाचेवाड, फौजदार पंडित यांनी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजुला करत रस्त्यातील वाहतुक सुरळीत सुरू करुन दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT