महाराष्ट्र बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांना उपस्थित दिवसांचे वेतन:अनुपस्थित राहिल्यास आठवड्याचा पगार कपात 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, या हेतूने सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे दिवस ठरवून दिले जाणार आहेत. ठरवून दिलेल्या दिवशी उपस्थित न राहणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे संपूर्ण आठवडाभराचे वेतन कपात करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यांना उपस्थित राहिलेल्या कालावधीचेच वेतन मिळेल, असेही ही वित्त विभागाने शुक्रवारी स्पष्ट केले आहे.सद्यस्थितीत राज्य सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांची संख्या 17 लाखांपर्यंत असून निवृत्त झालेल्या पेन्शनधारकांची संख्या सात लाखांपर्यंत आहे.

दरमहा यांच्या वेतनासाठी किमान 12 हजार कोटी रुपयांचा खर्च होतो. मात्र, लॉकडाउनमुळे मे महिन्यात साडेचार हजार कोटींचा महसूल मिळाला. तर मार्च महिन्यातही अशीच परिस्थिती राहिली होती आणि आता जूनमध्येही अपेक्षित महसूल मिळणार नाही, असेच चित्र आहे. या पार्श्वभूमीवर उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असून सर्वाधिक खर्च सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतो आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने असा कठोर निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

वित्त विभागाच्या आदेशानुसार... 
-कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक ते दोन दिवस 
कार्यालयात उपस्थित राहणे बंधनकारक 
- कार्यालय प्रमुखाने ठरवून दिलेल्या दिवशी गैरहजर 
राहिल्यास संपूर्ण आठवड्याचेच वेतन होणार कपात 
- वैद्यकीय कारणास्तव रजेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूट 
- विनापरवाना मुख्यालय सोडून गेलेल्या 
कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश 
- उपस्थित कालावधीचेच वेतन काढले जाणार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP AB Form Controversy: नाशिकमध्ये भाजपचे AB फॉर्म पळवले, गाडीत दोन आमदार अन् जिल्हाध्यक्ष... कार्यकर्त्यांकडून गाडीचा पाठलाग, Video पाहा...

Sangli Crime News ‘दारात उंदीर का सोडलास?’ शेजाऱ्यांनी पती-पत्नीलाच चोपलं, अन्...

Latest Marathi News Live Update : आपच्या शहराध्यक्षाचा सायकल वरून येऊन निवडणुक अर्ज दाखल

New Labour Code : आता कर्मचाऱ्यांना नोकरी सोडताच मिळणार ग्रेच्युटी! नवीन कामगार कायद्यात नेमका काय बदल झाला?

स्टार प्रवाह कँडी क्रश खेळतंय का? नवी मालिका 'तुझ्या सोबतीने'ची वेळ पाहून प्रेक्षक चक्रावले; म्हणतात- अत्यंत घाईत...

SCROLL FOR NEXT