crime Sakal
महाराष्ट्र बातम्या

मंगळवेढ्यातील घटना! चुलत वहिनीसोबतच्या प्रेमसंबंधातून २० वर्षीय तरूणाने मनोरूग्ण महिलेला जाळले; प्रेयसीच्या आत्महत्येचा केला बनाव, पण पोलिसांनी सीडीआर काढला अन्‌...

किरण सावत (वय २२) हिचे चुलत दीर निशांत (वय २०) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यांना पळून जाऊन एकत्र राहायचे होते. त्यामुळे किरणने आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी निशांतने पंढरपूर येथून एक अनोळखी मनोरूग्ण महिला आणली होती. त्या महिलेला घरासमोरील कडब्याच्या गंजीत ठेवले आणि निशांतने तिला खानापूर येथे नेऊन सोडले आणि मित्राला तेथून न्यायला सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

मंगळवेढा : तालुक्यातील पाटखळ येथे २२ वर्षीय विवाहितेचा कडब्याच्या गंजीत जळून मृत्यू झाल्याच्या प्रकरणास नाट्यमय वळण लागले आहे. दोन वर्षे वयाने लहान असलेल्या चुलत दिरासोबत असलेल्या प्रेमसंबंधातून प्रेयसी व प्रियकराने मिळून मनोरूग्ण अनोळखी महिलेला जाळले. पण, संशयित आरोपीने चुलत वहिनीच मयत झाल्याची आरडाओरड केली, पण मंगळवेढा पोलिसांनी काही तासांतच हा बनाव उघड केला. आता त्या दोन्ही संशयित आरोपींना उद्या (ता. १६) मंगळवेढा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

दशरथ मनोहर दांडगे (वय ४५, रा. आंबे, ता. पंढरपूर) यांची मुलगी किरण हिचा फेब्रुवारी २०२२ मध्ये पाटखळ येथील नागेश दिगंबर सावत याच्यासोबत विवाह झाला होता. तिला एक मुलगी होती, पती तिच्यावर जिवपाड प्रेम करीत होता. दरम्यान, १४ जुलैच्या पहाटे ३.३० वाजता दत्तात्रय सावत याने दशरथ दांडगे यांना फोन करून सांगितले, की ‘तुमची मुलगी किरणने पेटवून घेतले आहे. तुम्ही लवकर या’. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक पहाटे ४.१५ वाजता किरणच्या घरी पोचले. जावयाने सांगितले की, किरणने पेटवून घेतले आहे. जळालेल्या गंजीमध्ये एका महिलेचा मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत दिसत होता. मृतदेह कोणाचा हे ओळखता येत नव्हते. माझी मुलगी किरणला कोणत्या कारणाने मारले, तिला कोणी व कशाने मारले, याचा तपास होऊन दोषीवर कठोर व कायदेशीर कारवाईची मागणी दशरथ दांडगे यांनी पोलिसांकडे केली.

दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड व पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे, पोलिस उपनिरीक्षक नागेश बनकर यांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आणि घटनास्थळावरील मोबाईलवरून किरण पहाटे तीननंतर घरातून निघून गेल्याची बाब समोर आली. पोलिसांनी तिला कराडजवळ पकडले. मृत महिला किरण नसल्याची खात्री पोलिसांना झाली. पोलिसांनी तिच्यासह चुलत दिराला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक बोरीगिड्डे तपास करीत आहेत.

पळून जाऊन एकत्र राहण्यासाठी केला खून

किरण सावत (वय २२) हिचे चुलत दीर निशांत (वय २०) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. त्यांना पळून जाऊन एकत्र राहायचे होते. त्यामुळे किरणने आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी निशांतने पंढरपूर येथून एक अनोळखी मनोरूग्ण महिला आणली होती. त्या महिलेला घरासमोरील कडब्याच्या गंजीत ठेवले आणि निशांतने तिला खानापूर येथे नेऊन सोडले आणि मित्राला तेथून न्यायला सांगितले. आम्ही विवाह करणार असल्याचेही निशांतने मित्राला सांगितले होते. कोणाला संशय येऊ नये म्हणून निशांत पुन्हा परतला होता. त्यानेच कडब्याची गंज पेटवली आणि त्यानेच आरडाओरड केली होती. आग विझविण्यासाठी देखील तोच पुढे पुढे करीत होता.

पोलिसांनी मोबाईलचा ‘सीडीआर’ काढला अन्‌...

पोलिसांनी किरण सावत हिच्या मोबाईलचा सीडीआर (कॉल डिटेल्स रिपोर्ट) काढला आणि त्यावरून शेवटचा कॉल निशांतला गेल्याची बाब उघड झाली. त्यावरून पोलिसांनी निशांतला ताब्यात घेतले. किरणसोबत कसे संबंध होते असे विचारल्यावर त्याने फार ओळख नसल्याचे सांगितले. पण, त्याच्या मोबाईलमध्ये किरणचे फोटो होते, त्याने इन्स्टाग्रामवरील मेसेज डिलिट केले होते. तो स्टोरी बनवून सांगत असल्याचे समजल्याने पोलिस म्हणाले, ‘ती जिवंत असती तर लग्न करता आले असते आणि तू निर्दोष सुटला असता’. त्यावेळी निशांतने किरण जिवंत असल्याचे सांगितले. तिला व्हिडिओ कॉल करायला लावला आणि पोलिसांनी त्या मोबाईलचे लोकेशन काढले. तिला कराड पोलिसांच्या मदतीने पकडल्यावर पोलिसांनी निशांतलाही अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: भारत - पाकिस्तान तिसऱ्यांदा आमने-सामने येणार, फायनलमध्ये महामुकाबला रंगणार! बांगलादेशचे आव्हान संपले

Solapur Flood : टिंगल लावली काय? तळवटाचे पैसेसुद्धा निघत नाहीत, पूरग्रस्त शेतकरी थेट मंत्र्यांच्या गाडीसमोरच आडवे पडले

Khedkar Family: अपहरण प्रकरणात खेडकर कुटुंब अडचणीत; फरार दिलीप आणि मनोरमा खेडकरांविरोधात लुकआऊट नोटीस जारी

Aadul News : सरकट आर्थिक मदत देवून कर्जमाफी करावी; उद्धव ठाकरे

ग्रामविकास मंत्र्यांची मोठी घोषणा! पूरग्रस्तांना सुईसुद्धा विकत घ्यावी लागणार नाही, सरकारकडून मिळेल धान्य, कपडे, दिवाळीचे साहित्य

SCROLL FOR NEXT