Maharashtra Politics 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: आणखी एका आमदाराचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

धनश्री ओतारी

सत्तासंघर्षानंतर पक्षांमध्ये इन आऊट सुरु आहे. अशात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. आमदार मनिषा कायंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Manisha Kayande will join Shiv Sena)

मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा कायंदे यांचा फोन नॉटरिचेबल आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिंदेंसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसचे, ३ माजी नगरसेवकदेखील शिवसेनेच्या वाटेवर आहेत. Maharashtra Politics

मनिषा कायंदे यांच्यावर लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले आहेत. त्या लहानपणी वडिलांबरोबर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे ऐकायला जात. वडिलांची ग्रामीण भागात नेत्रं शिबिरे भरायची. त्यात त्या मदत करत. त्यामुळे त्यांना ग्रामीण महाराष्ट्र जवळून पाहता आला आहे. Maharashtra Politics

त्यांचे वडील तीनदा कारसेवेसाठी अयोध्येला गेले होते. 1992मध्ये मनिषा कायंदेही वडिलांबरोबर अयोध्येला कारसेवासाठी गेल्या होत्या. या अर्थाने त्यांना घरातूनच समाजसेवा आणि राजकारणाचं बाळकडू मिळालेलं आहे.

कायंदे यांनी भाजपमधून त्यांच्या राजकारणास सुरुवात केली. अयोध्येला जाऊन आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये काम सुरू केलं. तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं. या काळात त्यांनी जयवंतीबेन मेहता, सुषमा स्वराज, राजमाता विजयाराजे शिंदे यांच्यासोबतही काम करण्याची संधी मिळाली. 1997मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. Maharashtra Politics

शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्याने त्यांचा निसटता पराभव झाला. पुढे 2009मध्ये त्यांनी सायन कोळीवाडामधून विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, मनसेची लाट असल्याने त्यांचा पराभव झाला. पराभव होऊनही त्या थांबल्या नाहीत. त्यांनी विविध प्रश्नांवर सुमारे सव्वाशे आंदोलने केली.

पुढे 2012मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 2014मध्ये त्यांना शिवसेनेचं प्रवक्तेपद मिळालं. Maharashtra Politics

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांनी 'सुपर डान्सर चॅप्टर ५' मध्ये आदितीला दिला खास पाठिंबा

SCROLL FOR NEXT