अखेर मनोहरमामाला बारामती पोलिसांनी साताऱ्यात पकडले sakal
महाराष्ट्र बातम्या

अखेर मनोहरमामाला बारामती पोलिसांनी साताऱ्यात पकडले

बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करीत अनेकांची फसवणूक केली होती

कल्याण पाचांगणे

माळेगाव : बारामतीसह (baramati) अनेक ठिकाणच्या गुन्ह्यांमध्ये आवश्यक असलेल्या मनोहर मामा भोसले याला बारामती पोलिसांसह पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथकाचे अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने साताऱ्यात (satara) पकडले. भोसले वगळता अद्याप दोन आरोपींना पकडणे बाकी असल्याची माहिती बारामती तालुका पोलीस निरीक्षक महेश गवारी यांनी दिली.

बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करीत एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो, असे सांगून मनोर मामा या आरोपी सर तिघांनी संगणमत करीत रुग्णाच्या कुटुंबियांची दोन लाख ५१ हजार रुपये घेवून फसवणूक केली होती. हा फसवणूकीचा प्रकार मागिल तिन वर्षांपासून सुरू होता. त्या प्रकरणी शशिकांत सुभाष खरात ( वय 23, व्यवसाय मोबाइल दुरुस्ती दुकान,  रा. साठेनगर, कसबा बारामती) यांनी गुरुवार (ता. 9) रोजी तिघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

त्यानुसार आज पोलिसांनी निर्णायक भूमिका घेत मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जिल्हा सोलापूर) , विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार शिंदे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. महाराष्ट्र नरबळी कायद्यासह इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा, जादूटोणा, औषध चमत्कारी उपाय करणे, फसवणूक करणे, जीवे मारण्याची धमकी देणे आदी कलमाच्या आधारे पोलिसांनी वरील संशयित आरोपी मनोहर मामा व त्याच्या साथीदारांविरुद्ध  कारवाई केली होती. दरम्यान, शशिकांत खरात यांनी फिर्यादीमध्ये वरील आरोपींविरुद्ध गंभीर तक्रार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

"मागिल तीन वर्षापासून मनोहर भोसले याने मी बाळूमामा यांचा अवतार असल्याचे भासविले. तुझ्या वडिलांचा गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो असे त्याने सांगितले. तसेच बाभळीचा पाला, साखर, भंडारा माझ्या आजारी वडीलांना खाण्यास दिला व विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा, ओमकार  शिंदे (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्यासोबत संगणमत करून मनोहरमामा याने वेळोवेळी दोन लाख 51 हजार पाचशे रुपये घेतले. हे पैसे न दिल्यास माझ्या वडिलांना जीविताची भीती त्यांनी घातली. तसेच हे पैसे परत मागितल्यास मला जीवे मारण्याची धमकी दिली," अशी तक्रार खरात यांनी फिर्यादिमध्ये नमूद केले आहे. पोलिस निरिक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल घुगे वरिल प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT