Manohar Parrikar Birth Anniversary
Manohar Parrikar Birth Anniversary esakal
महाराष्ट्र

Manohar Parrikar Birth Anniversary : मनोहर पर्रिकरांची ती शेवटची इच्छा अपूर्णचराहिली...

सकाळ डिजिटल टीम

Manohar Parrikar Birth Anniversary : देशाच्या राजकारणात असे काही नेते आहेत ज्यांची प्रतिमा जिवंत असताना आणि मृत्यूनंतरही कायमच पांढऱ्याशुभ्र रंगांसारखी स्वच्छच राहीलीय. दिवंगत मनोहर पर्रीकर यांची गणतीही अशाच नेत्यांमध्ये होते. मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदापासून ते देशाच्या संरक्षण मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. पण ते नेहमीच साधेपणाने आणि संयमाने जगले. मनोहर पर्रीकर नेहमीच प्रामाणिकपणा, स्वच्छ प्रतिमा आणि साधी राहणी यासाठी ओळखले जायचे. चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री होऊनही पर्रीकरजी नेहमीच दिखाऊपणापासून दूर राहिले.

मनोहर पर्रीकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी झाला. पर्रिकर हे आयआयटी पदवी घेतलेले देशातील पहिले मुख्यमंत्री होते. देशातील सर्वात प्रतिष्ठित आयआयटी मुंबईमधून त्यांनी बि.टेक ची पदवी घेतली होती. मनोहर पर्रीकर हे पहिले मुख्यमंत्री होते जे कॅन्सरचे निदान होऊनही एक वर्षाहून अधिक काळ पदावर राहिले. विशेष म्हणजे पंतप्रधानपदासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करणारे पर्रीकर हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री होते.

शालेय जीवनातच ते RSS मध्ये सहभागी झाले. उत्तर गोव्यातील म्हापसा येथील एका मध्यमवर्गीय व्यापारी कुटुंबात जन्मलेले मनोहर गोपालकृष्ण प्रभू पर्रीकर यांनी संघाचा कार्यकर्ता म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला. पर्रिकर हे शालेय जीवनापासून संघाशी संबंधित होते. संघटनेकडून मिळालेले प्रशिक्षण, विचारधारा त्यांना महत्त्वाचे निर्णय घेण्यास मदत करते असा विश्वास पर्रीकरांना होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2014 मध्ये पर्रीकर यांची संरक्षण मंत्री म्हणून निवड केली. त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांचे अनेकदा कौतुक केले. सर्जिकल स्ट्राईक होईपर्यंत पर्रीकर देशाचे संरक्षण मंत्री होते. 2018 मध्ये झालेल्या सर्जिकल स्ट्राईकने तर त्यांच्याबद्दलचा आदर आणि सन्मान अधिकच दृढ झाला.

राजकीय कारकीर्द

पर्रीकर पहिल्यांदा 1994 मध्ये गोवा विधानसभेवर निवडून आले. जून 1999 ते नोव्हेंबर 1999 या काळात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदही भूषवले. पर्रीकर यांचा मुख्यमंत्री म्हणून पहिला कार्यकाळ 24 ऑक्टोबर 2000 ते 27 फेब्रुवारी 2002 होता. यानंतर, 5 जून 2002 ते 29 जानेवारी 2005 पर्यंत, त्यांनी पुन्हा गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. 2012 मध्ये, त्यांनी यशस्वीरित्या भाजपला बहुमतापर्यंत नेले आणि तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री बनले. नोव्हेंबर 2014 पर्यंत ते या पदावर राहिले. जेव्हा मोदींनी त्यांना संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी घेण्यासाठी केंद्रात बोलावले. दर वीकेंडला गोव्यात परतल्यामूळे त्यांच्यावर अनेकदा टीका केली जायची. त्यांना दिल्लीचे खाणे आवडत नाही. तर, त्यांना गोव्याच्या खाद्यपदार्थांची खूप आठवण येते, असे ते म्हणायचे.

मनोहर पर्रीकर यांची भारतीय राजकारणातील सर्वात प्रामाणिक नेत्यांमध्ये गणना होते. मनोहर पर्रीकर स्कूटीने प्रवास करायचे, त्यांच्या घराचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी सदैव खुले असायचे. पर्रीकर नेहमी चप्पल घालून घराबाहेर पडत. मनोहर पर्रीकर यांनी आपल्या मुलाचे लग्न लावून दिले तेव्हा ते इतर राजकारण्यांसाठी एक उदाहरण बनले. त्यांच्या मुलाचे लग्न कोणत्याही राजकीय बडेजाव दिसला नाही. अत्यंत साधेपणाचे ते पार पडले.

भारतीय राजकारणात मनोहर पर्रीकर यांची ओळख 'मिस्टर क्लीन' अशी आहे. अत्यंत साधे आणि सामान्य जीवन जगणारे मनोहर पर्रीकर हे नेहमीच जनतेशी जोडले गेले. नेहमी हाफ शर्ट घालून फिरणारे पर्रीकर गोव्यातल्या रस्त्यांवर स्कूटरवर फेरफटका मारायचे. कधी कधी सायकलही चालवायचे.

पर्रीकरांच्या साधेपणाला तोड नाही

विधानसभेत जाताना पर्रीकर कधी-कधी स्कूटरचा वापर करत. कोणतीही सुरक्षा न घेता ते कोणत्याही चहाच्या टपरीवर चहा पिताना दिसायचे. फ्लाइटमध्ये ते नेहमी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करत असत. ते स्वत:ला मिळणाऱ्या पगारातून मोबाईल आणि टेलिफोनचे बिल भरायचे. ते कधीकधी बसनेही प्रवास करायचे. पर्रीकरांच्या या सवयी गोव्यातील लोकांसाठी सामान्य होत्या. खरच त्यांच्या या साध्या पण सच्च्या स्वभावाला तोड नाही.

शेवटची इच्छा अपूर्ण राहिली

मला माझ्या आयुष्यातील शेवटची 10 वर्षे माझ्यासाठी जगायची आहेत. मी माझ्या राज्याला खूप काही दिले आहे. केवळ पक्षाच्या दबावाखातर मी कायमस्वरूपी काम करत राहू शकत नाही. मला स्वत:साठी वेळ हवाय. जो मी गेल्या कित्येक वर्षात स्वत:ला दिलेला नाही, असे एकदा पर्रीकर यांनी एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

SCROLL FOR NEXT