Manoj Jarange Esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: मला मारुनच दाखवा... मराठा बांधवांना न जुमानता जरांगे फडणवीसांच्या सागर बंगल्याकडे निघाले

Manoj Jarange: बोलत असताना जरांगे पाटील अचानक आक्रमक झाले, जमलेला मराठा समाज त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केरत होते, मात्र ते शांत होत नव्हते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज महत्त्वाची आणि निर्णायक बैठक घेतली आहे. या बैठकीत मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव घेऊन पहिल्यांदाच थेटच आरोप केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत यासाठी सर्व एकटा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतोय, असे जरांगे म्हणाले आहेत. दरम्यान बोलत असताना जरांगे पाटील अचानक आक्रमक झाले, जमलेला मराठा समाज त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते शांत होत नव्हते. बैठक स्थळी अचानक एकच गोंधळ उडाला. मराठा समाजाच्यावतीने अनेकजण जरांगे शांत बसण्याचे आवाहन करत होते.

मनोज जरांगे उपोषण करत होते त्याठिकाणी बोलत असताना ते अचानक आक्रमक झाले, मी सागर बंगल्यावर येतो. मी आता येतो सागर बंगल्यावर तुम्हाला माझा बळी घ्या पण खोटे आरोप करू नका, असं म्हणत मनोज जरांगे उठून जाऊ लागले त्यावेळी जमलेल्या मराठा समाजाने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

'मी सागर बंगल्यावर येतो, घ्या माझा बळी असं म्हणत जरांगे पाटील म्हणाले. यानंतर ते स्टेजवरून उठून निघाले होते. उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे स्टेजवर गोंधळ निर्माण झाला. जरांगे मी मुंबईला चालत जाणार असं म्हणत जागेवरून उठले. तेव्हा उपस्थित मराठा समाजाने त्यांना शांत होण्याचा सल्ला दिला. जरांगेंना श्वास घेताना त्रास होत होता. मात्र तरीही ते आक्रमकपणे बोलत असताना दिसले. तब्येत बिघडेल तुम्ही शांत व्हा अशी विनंती उपस्थित असलेले मराठा बांधव करत होते.

'सलाईनमधून मला विष देण्याचा प्रयत्न'; मनोज जरांगेंचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

मला मारण्याचा प्रयत्न होत आहे. मी सागर बंगल्यावर येतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला मारुन दाखवावं, असे थेट आव्हान मनोज जरांगे यांनी केले आहे. सगळ्यामागे फडणवीस असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

छत्रपतींशी शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मी कोणत्या पक्षाचा नाही मी फक्त माझ्या समाजाचा आहे. मराठ्यांना संपवण्याचा कुणाची तरी डाव आहे. यात देवेंद्र फडणवीस यांचा हात आहे हे मी इथे स्पष्ट सांगतो. मराठ्यांना-मराठ्यांच्या हातूनच हरवण्याचा त्यांचा डाव आहे, असा गंभीर आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT