Manoj Jarange 
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange: "जे मराठाद्वेषी आहेत त्यांचेच चेले गुणरत्न सदावर्ते"; मनोज जरांगेंची देवेंद्र फडणवीसांवर टीका

Sandip Kapde

Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणावर बसलेले असलेले मनोज जरांगे यांनी राज्याच्या दौरा केला. सरकारला दिलेली ४० दिवसांची मूदत संपली आता मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. आज आज आंतरवाली सराटी येथे जरांगेंची जाहीर सभा होणार आहे.

या सभेपूर्वी वकील गुणरत्न सदावर्तें यांनी मनोज जरांगे पाटील यांना अटक करावी अशी मागणी केली होती. याबाबत त्यांनी संभाजीनगर पोलिसांना पत्र दिले होते. मनोज जरांगे पाटील यांची सभा हिंसक होईल म्हणून त्यांना अटक करावी, असं गुणरत्न सदावर्तें पत्रात म्हटले होते. यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या मालकांनी समज द्यावी असं जरांगे पाटील म्हणाले आहेत. गुणरत्न सदावर्ते हे कोणाचे पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे, चेल्यांना मी उत्तर देत नसतो असंही जरांगे पाटील म्हणाले.

हे हास्यास्पद आहे. त्यांच्या मालकांचे देखील असेच स्टेटमेंट होते की पोलिसांवर अन्याय झाला. ते गप बसले आता गुणरत्न सदावर्ते यांना समोर केले.  १०६ आमदार तुम्हाला यासाठी निवडून दिले होते का? मराठा समाज देखील गरजेचा आहे. त्यांची ताकद तुम्हाला दिसेल. आपण एका पक्षाचे मोठे नेते आहात. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहात. त्यामुळे सदावर्तेंना समज द्यावी, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

एक मराठा लाख मराठा घोषणा द्यायची आणि मराठ्यांना विरोध करायचा असं काही नेत्यांचं धोरण आहे. गोरगरीबांचं आरक्षण रद्द करुन त्यांच्या ताटात विष कसं कालवायचं हे नेत्यांना माहित आहे. जे मराठाद्वेषी आहेत त्यांचेच चेले गुणरत्न सदावर्ते आहेत, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली. ते टीव्ही ९ मराठीसोबत बोलत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT