Manoj Jarange Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Shinde on Manoj Jarange: जरांगेंच्या मागण्या कशा बदलत गेल्या अन् शेवटी...; मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सगळंच सांगितलं

मनोज जरांगेंची भाषा ही कार्यकर्त्याची भाषा नसून राजकीय भाषा आहे असा आरोपही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या कशा कशा बदलत गेल्या आणि शेवटी त्यांची भाषा कशी बदलली याचा संपूर्ण लेखाजोखाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत मांडला. यावेळी त्यांनी जरांगेंच्या म्हणण्याप्रमाणं सरकारनं त्यांच्या मागण्या कशा पूर्ण केल्या हे सगळं यावेळी सांगितलं. (manoj jarange demands for maratha resevation changed time to time cm told everything about it)

कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण दिलं

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, "आपण मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणार, ओबीसी आणि इतर समाजावर अन्याय न करता टिकणार आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. हे आरक्षण आपण एकमतानं दिलं. हे आरक्षण देत असताना मनोज जरांगे यांनी मराठवाड्यातील जुन्या कुणबी नोंदी असलेल्यांना दाखले मिळत नाहीत, अशी तक्रार केली. त्यानंतर संपूर्ण राज्यात आपली यंत्रणा कामाला लागली, ज्या नोंदी सापडत नव्हत्या त्या सापडू लागल्या. पूर्वीचा कायदा होता त्यानुसार ते दाखले देणं सुरु केलं" (Marathi Tajya Batmya)

...आणि जरांगेंच्या मागण्या बदलत गेल्या

न्या. शिंदे समिती यावर बारकाईनं काम करत होती. जरांगे स्वतः म्हणाले होते की, या समितीला मुदतवाढ दिली पाहिजे. त्यानंतर जसं जसं ते सांगत गेले त्यानुसार तेलंगणा आणि हैदराबादमधील जुन्या नोंदी काढत गेलो आणि दाखलेही आपण दिले. त्यानंतर जरांगेंनी दुसरी मागणी केली की आता सरसकट आरक्षण पाहिजे. (Latest Marathi News)

पण आम्ही त्यांना सांगितलं की, सरसकट आरक्षण देताच येणार नाही ते कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. त्यानंतर सगेसोयरेचा विषय आला, त्यानंतर मराठवाड्याची व्याप्ती सोडून त्यांनी राज्याच्या पातळीवर प्रमाणपत्र देण्याची मागणी केली. खरंतर राज्य पातळीवर अशी कोणाचीही मागणी नव्हती. तर आम्हाला केवळ मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण पाहिजे, अशी मागणी होती. जरांगेंनी नंतर ओबीसीतून आरक्षण द्या अशी मागणी केली, अशा प्रकारे त्यांच्या मागण्या बदलत गेल्या.

जरांगेंनी आमची उणीदुणी काढली

मनोज जरांगेंशी आम्हाला काही देणं घेण नाही, पण सरकारनं मराठा समाजासाठी जे काम केलं ते स्विकाराचं सोडून मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची सगळी उणीदुणी त्यांनी काढली. सरकार म्हणून आम्ही विरोधीपक्षाला सोबत घेऊन निर्णय घेतला, त्यानंतरही ते एकेरी पद्धतीनं बोलले. त्यानंतर तर कहर झाला आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप केला की त्यांना विष देऊन मारणार आहेत. (Latest Maharashtra News)

मी पत्रकार परिषदेतही बोललो होतो की, ही कार्यकर्त्याची भाषा नाही ही राजकीय भाषा आहे याच्या मागं कोण आहे? जातीजातीत भांडण लावण्याचं काम करता येणार नाही, हे आम्हाला कळलं म्हणून आम्ही ओबीसींवर अन्याय होणार नाही असा विश्वास त्यांना दिला, होता" अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT