Manoj Jarange Family Reaction 
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Family : ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड... विजयानंतर जरांगे पाटलांच्या मुलाची भावुक प्रतिक्रिया

Manoj Jarange Family Reaction : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या कुटुंबियांनी आंदोलनाला मिळालेल्या यशानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित कणसे

Manoj Jarange Family Reaction : मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे. जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत, सोबत याबाबतचा जीआर देखील काढण्यात आला आहे. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

टीव्ही९ मराठीशी बोलताना मनोज जरांगे यांच्या पत्नीम्हणाल्या की, आरक्षण भेटल्याने नक्कीच आनंद झाला, तो आनंद शब्दात सांगता येणार नाही असा आहे. उपोषण बसणार याचं दुखः झालं होतं, त्यामुळे रडू देखील आलं होतं. पण सरकारने ती वेळ येऊ दिली नाही यासाठी सरकारला खूप शुभेच्छा. साडेपाच महिने झालं ते घरी आले नाहीत. पण आता न्याय मिळाल्याने ते नक्की घरी येतील.

मराठ्यांचा विजय झाला आहे. पप्पा घरी येतील त्याचा खूप आनंद आहे. ज्यांनी आत्महत्या केली त्यांचं हे मोठं यश आहे, त्यांच्या बलिदानामुळेच खरंतर आरक्षण मिळालं अशी प्रतिक्रिया मुलीने दिली. तर दुसरी मुलगी म्हणाली की, आज मराठ्यांचा सत्तर वर्षांचा लढा सार्थ ठरला. पप्पांनी साडेपाच महिने झालं जो संघर्ष केला त्याला फळ मिळालं. मराठा समाजाला खूप आनंद झाला आहे. मराठा समाजासाठी आज दिवाळी आहे. पप्पांना खूप त्रास सहन करावा लागला. साडेपाच महिने पप्पा घरी आले नाहीत, संभाजीनगर मध्ये रुग्णालयात भरती असताना आम्ही भेटायला जायचो. आंदोलनाच्या ठिकाणी कधी गेलो नाहीत, पप्पा घरी तर आलेच नाहीत. पप्पांचा हट्ट होता की समाजाला आरक्षण मिळवून देईन आणि आज तो पूर्ण केला आहे असे मत व्यक्त केलं.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळल्याबद्दल बोलताना मनोज जरांगे यांचा मुलगा म्हणाला की, पप्पांच्या लढ्याला यश आलं. मराठ्यासाठी हा सुवर्णक्षण आहे. गेल्या सत्तर वर्षांपासून समाज यासाठी लढत होता आणि आज तो सार्थ ठरला आहे. तीनशेच्या जवळपास बांधवानी आत्महत्या केल्या, बलिदान दिलं त्यांच्या लढ्याला यश आलं यातचं आमचं समाधान आहे. ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड या भूमिकेत आम्ही आहोत. आता पप्पांना नक्कीच घरी बोलवेण आणि त्यांचं थाटामाटात स्वागत करेल.

पहिल्यापासून असाच जिद्दी होता. आम्ही कधी आडवलं नाही. जनतेला यश यत असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देत राहिलो. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यांनी दिलं त्यामुळं आनंद झाला असे जरांगे पाटील यांचे वडिल म्हणले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT