Manoj jarange  sakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : ''बेट्या तुझा टांगा...'' मनोज जरांगेंचा इशारा नेमका कुणाला? थेटच म्हणाले...

मंगळवारी आंतरवाली सराटी इथं झालेल्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिला. जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळ यांना राज्यामध्ये मराठा-ओबीसी दंगल पेटवायची आहे. परंतु आपण शांत राहून गावखेड्यातले आपले संबंध बिघडू द्यायचे नाहीत.

संतोष कानडे

Maratha Reservation : उपोषणानंतर १२ दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी आंतरवाली सराटीमध्ये जात आपली भूमिका स्पष्ट केलं.

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटल्यानंतर ओबीसी समूहाच्या वतीने लक्ष्मण हाके यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. सगेसोसोयऱ्याची अंमलबजावणी करु नये, कुणबी प्रमाणपत्रांची तपासणी करावी, जात प्रमाणपत्र आधार कार्डला जोडावं, अशा मागण्या करण्यात आलेल्या होत्या.

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला राज्यातल्या जवळपास सगळ्याच ओबीसी नेत्यांनी समर्थन दिलं. छगन भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

मंगळवारी आंतरवाली सराटी इथं झालेल्या सभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना इशारा दिला. जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळ यांना राज्यामध्ये मराठा-ओबीसी दंगल पेटवायची आहे. परंतु आपण शांत राहून गावखेड्यातले आपले संबंध बिघडू द्यायचे नाहीत.

जरांगे पुढे म्हणाले की, आंतरवाली सराटीमध्ये सगळा समाज आपला आहे. तो येवल्याहून येऊन आपल्यात दुही निर्माण करेल.. त्यामुळे आपल्याला एक होऊन राहावं लागेल.. भाऊ तुझा इंगाच जिरवतो, बेट्या तुझा टांगा पलटवणार... असं म्हणत जरांगेंनी छगन भुजबळांना इशारा दिला.

दरम्यान, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याचं यापूर्वी जरांगेंनी स्पष्ट केलं होतं. आता त्यांनी थोडी सावध भूमिका घेत १३ तारखेला याबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. २८८ जागा लढायच्या की पाडायच्या, याचा निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे १३ तारखेपर्यंत सरकार सगेसोयऱ्याचा कायदा करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shevgaon Accident: खानापूरच्या तीन युवकांवर काळाचा घाला;दिवाळीच्या खरेदीला जात असताना अपघात; गावावर शोककळा

Pune Crime News : पुण्यात दिवाळीच्या पूर्वसंध्येला रक्तरंजित थरार; कोथरूडमध्ये तरुणाची कोयत्याने वार करून हत्या

MLA रेस्ट हाऊसमध्ये अनोळखी तरुण-तरुणी घुसले, काँग्रेस आमदाराने दार उघडताच आक्षेपार्ह अवस्थेत दिसले; राजकारणात खळबळ, नेमकं प्रकरण काय?

Latest Marathi News Live Update: इंधनाची गुणवत्ता आणि वापराबाबतच्या तक्रारींची सविस्तर चौकशी सुरू- मुख्यमंत्री डी. के शिवकुमार

Ahilyanagar News: तरुणाने जीव संपवला; पत्नीसह आठ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT