Manoj Jarange Patil 
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange Patil: सदावर्तेंच्या गाड्यांच्या तोडफोडीचे समर्थन नाही, मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं

Sandip Kapde

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. आज मराठा आंदोलकांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड केली. त्यामुळे सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या अटकेची मागणी केली आहे. यावर जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे म्हणाले, मला काहीच माहित नाही मी आता झोपेतून उठलो. मराठा शांततेत आंदोलन करत आहे. हजारो गावात आंदोलन सुरु आहे. कोणी गाडी फोडली असेल तर त्याचे समर्थन होणार नाही. सरकारने आरक्षणाचा विषय संपवावा.

मराठ्यामध्ये माणुसकी जिवंत आहे. मराठ्यांनी सरकारचे खूप लाड केले. त्यांचे पोरबाळं आम्ही मोठे केले. समाजातील कोण कोण श्रद्धेय मराठ्यांना आरक्षण मिळवू देत नाहीत हे सर्वांना माहित आहे. मराठा समाजाने या श्रद्धेयांना खूप मोठं केलं आहे. खूप लाड आहेत. ते आता विमानाने फिरतात. मराठ्यांनी मोठं केल्यामुळे त्यांचे मुलं श्रीमंतीत जगतात. यांची काही दिवसात मी समोर आणणार आहे. सगळ्या राजकीय पक्षाची लोक, सत्तेतील लोक मराठ्यांना मोठं होऊ देत नाहीत, असा आरोप जरांगे पाटील यांनी केला. (Maratha Reservation Update)

आरक्षण द्यायचे नव्हते तर वेळ मागायचा नव्हता. आधीच ५० वर्षाचा वेळ द्यायचा होता. आम्ही ४ दिवसांचा वेळ दिला तुम्ही १ महिन्याचा वेळ मागितला. आम्हाला नाटकं शिकवू नका. तुम्ही आमच्या दारात यायचं नाही तुम्ही आमच्या दारात येऊ नका, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी केला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात १७ वर्षांच्या मुलाची हत्या, पोलिसांनी भर पावसात काढली गुन्हेगारांची धिंड; मृताच्या आईने आरोपींना सर्वांसमोर चपलेने मारले

IND vs ZIM 1st T20I: भारतीय संघात पदार्पणासाठी ४ युवा खेळाडूंमध्ये स्पर्धा; वैभव सूर्यवंशीसारखा आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज आघाडीवर, कशी असेल Playing XI?

Live Updates Marathi : विद्यार्थ्यांसोबत सरकार क्रूरपणे वागले, इंग्रज परवडले : उद्धव ठाकरे

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांचे टेन्शन वाढले! सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; चांदीही चमकली, पाहा ताजे भाव

जय-शरूमध्ये फुलणार प्रेमाचा बहर, 'सनई चौघडे' मालिकेतील प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, 'दोघांची केमिस्ट्री...'

SCROLL FOR NEXT