Manoj Jarange  
महाराष्ट्र बातम्या

"माझा मराठा समाज उन्हात मी देखील उन्हात सभा घेणार"; मनोज जरांगेंची व्यासपीठावरील छत काढण्याची विनंती

Sandip Kapde

जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी गावात आज मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा आयोजित केली आहे. या सभेची जोरदार तयारी करण्यात आली. लाखोंच्या संख्येत महाराष्ट्रातील मराठा समाज आंतरवाली सराटी येथे उपस्थित आहे. आंतरवली सराटी गावातील 100 एकर शेतात घेण्यात आलेल्या या सभेत मराठा आरक्षणाची पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे.

दरम्यान मराठा समाज उन्हात मनोज जरांगे यांच्या सभेसाठी आले आहेत. हा सर्व समाज उन्हात असल्यामुळे मी देखील उन्हात सभा घेणार असं जरांगे म्हणाले. यावेळी त्यांनी व्यासपीठावरील छत काढण्याची विनंती केली. 

यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारपुढे त्यांच्या मागण्या मांडल्या. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे.  तसेच कोपर्डीतील तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. (Latest Marathi News)

वेगळा प्रवर्ग करुन टीकणारं आरक्षण देण्यात यावे. ५० टक्क्यांच्या बाहेरचं आरक्षण घेणार नाही. घरा-घरातील मराठा पेटून उठा आहे.  ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण द्या. सराकराल आपण ४० दिवस दिले होते. त्यातील आता फक्त १० दिवस राहिले आहेत. १० दिवसात आरक्षण दिले नाही. तर १० व्या दिलशी सांगू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT