manoj jarange maratha reservation esakal
महाराष्ट्र बातम्या

Maratha Reservation : ना अन्न-पाणी, ना वैद्यकीय उपचार, जरांगे पाटलांनी दुसरं आमरण उपोषण सुरू करताना केली भूमिका स्पष्ट

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत पुन्हा भूमिका स्पष्ट केली आहे.

रोहित कणसे

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतचा निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेला वेळ काल संपला आहे. यानंतर आज (बुधवार) जरांगे पाटील यांनी आपण पुन्हा अमरण उपोषण सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे. हे उपोषण कुठलेही अन्न-पाणी आणि वैद्यकीय उपचार न घेता केलं जाणार असल्याचे जरांगे म्हणाले आहेत.

अमरण उपोषणाला आजपासून पुन्हा सुरूवात होत आहे. २९ ऑगस्टला अमरण उपोषण सुरू झालं. १४ तारखेला मुख्यमंत्र्यांनी हे उपोषण मराठा समाजाला तुमच्या मागणीप्रमाने आरक्षण देऊ, कायद्यात ते टीकलं पाहिजे म्हणून एक महिन्याचा वेळ मागितला आणि प्रत्यक्ष येऊन उपोषण सोडवलं होतं. तेव्हापासून आपण साखळी उपोषण सुरु केलं.

सरकारने आपल्याकडून ३० दिवसांचा वेळ घेतला आज ४१ दिवस झाले. सरकारने कोणतीच हलचाल केली नसल्याने, आपण स्थगित केलंलं अमरण उपोषण पुन्हा सुरू करत आहोत. महाराष्ट्रात मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावेत यासाठी हे दुसरं अमरण उपोषण करत असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितलं.

आज पासून हे अमरण उपोषण सुरू झालं. यामध्ये ना अन्न-पाणी, ना वैद्यकीय उपचार ना सलाईन एकदम कठोर आणि कडक अमरण उपोषण सुरू करतोय असेही मनोज जरांगे म्हणाले.

जरांगे पुढे बोलताना म्हणाले की, सरकार, मुख्यमंत्र्यांचा आणि राज्यातील सर्व राजकीय पक्षांचा सन्मान ठेवून ४० दिवस दिले आज ४१ वा दिवस आहे. पण कोणाकडूनच आरक्षण देण्यात आलं नाही. आम्हाला काल संध्याकाळपर्यंत आशा होती. सरकार गोरगरिबांच्या वेदना जाणून घेईल आणि आमच्या हक्काचं असणार ५० टक्क्यांच्या आतमधील ओबीसी प्रवर्गात आमचा समावेश होईल, पण ती सरकारकडून झाली नाही. म्हणून अंतरवली सरावटी येथे मराठा समाजाच्या वतीने अमरण उपोषण सुरू केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT