Manoj Jarange accused OBC leaders of conspiring against Maratha Community youth over reservation protest  
महाराष्ट्र बातम्या

Jarange on Bhujbal: सरकारनं भुजबळांवर लक्ष ठेवावं, कारण...; जरांगेंचं जोरदार प्रत्युत्तर

जालन्यात जरांगेंच्या होमग्राऊंडवर ओबीसी समाजाची आज सभा पार पडली यावेळी भुजबळांनी जरांगेंना टार्गेट केलं होतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

सांगली : जालन्यात मनोज जरांगेंच्या होमग्राऊंडवर ओबीसी समाजाची आज सभा पार पडली यावेळी भुजबळांनी जरांगेंना टार्गेट केलं होतं. भुजबळांच्या घणाघाती टीकेला आता मनोज जरांगे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे. त्यांच्याकडं टीका करण्यापलिकडं काहीही राहिलेलं नाही. पण आम्ही आरक्षणावर जो फोकस केला आहे तो ढळू देणार नाही. उद्यापासून त्यांना आम्ही महत्व देणार नाही, अशी भूमिका यावेळी जरांगेंनी मांडली. (Manoj Jarange strong reply to Chhagan Bhujbal on his harsh criticism at Jalna Rally)

जरांगे म्हणाले, "आम्ही चिडावं आणि या राज्यात शांतता राहू नयेत यासाठी या सर्वांचे प्रयत्न सुरु झाले आहेत. काहीही बोलायचं आणि शांतता बिघडवयाची हे काम हे करत आहेत. त्यांना काय माहिती मी किती शिकलो आणि काय शिकलो? ते किती शिकलेत ज्यामुळं आतमध्ये जाऊन आलेत. आम्ही राज्यात ओबीसी आणि मराठा वाद होऊ देणार नाही. (Latest Marathi News)

कारण तेही आमचेच बांधव आहेत. या नेत्यांनीचा त्यांच्या राजकारणाच्या स्वार्थासाठी कितीही प्रयत्न केले तरी ही मराठ्यांची एकजूट तुटत नाही आणि ओबीसी मराठा वादही होत नाही. पण एक ठासून सांगतो तुमच्या टीकेला उत्तर द्यायला आम्ही कच्चे नाहीत. पण आम्हाला आता तुम्हाला महत्वाचं द्यायचं नाही. तुम्ही किती खालच्या पातळीचे आहात हे आमच्या लक्षात आल्यामुळं आमचा दर्जा आम्ही घसरु देणार नाही"

सरकारनं भुजबळांवर लक्ष ठेवावं

या राज्यात वातावरण आम्ही खराब होऊ देणार नाही. सरकारनंच यांच्याकडं जास्तीचं लक्ष केंद्रीत करावं कारण हे राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवतील. त्यामुळं यांना थांबवावं, आम्ही आरक्षण मिळवण्यासाठी सज्ज आहोत. आम्हाला काहीही फरक पडत नाही कारण आम्ही पण ५० टक्के आहोत. (Marathi Tajya Batmya)

सासरा-जावयाचा प्रश्न नाही, तुम्हाला माहितीच नाही

भुजबळ कुठले आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आम्हाला काढायला भाग पाडू नका. आम्ही तुमचा बायोडेटा गोळा केलेला आहे. इथं सासरा-जवयाचा प्रश्न नाही. बीड जिल्ह्यातला मोठा समाज गोदा पट्ट्यात आलेला आहे, हे त्यांना माहिती नाही. कुणीतरी एका माकडानं त्यांना स्वार्थासाठी सांगितलं असेल. तुमच्या शेपटावर नाही पण तुम्हीच आमच्या पायावर पाय देऊ नका, नाहीतर तुमची सुद्धा आम्ही खैर करणार नाही.

कारण मराठ्यांच्या शेपटावर पाय दिल्यावर काय होतं? हे येणाऱ्या काळात तुम्हाला कळेल. हे जनतेच्या नजरेतून उतरले आहेत. मी खोटं बोलत असेल तर काल ओबीसी बांधवांनी शंभर जेसीबी लावून माझं स्वागत केलं नसतं. तुम्ही लोकांचं रक्त पिता, पैसे खाता आणि पाच-पाच वर्षे जेलमध्ये जाऊन बसता तुम्हाला कोण शेंदूर लावेल, असंही जरांगे यावेळी म्हणाले.

आमच्या नजरेतून तुम्ही आता उतरलात

आम्ही तुमच्या दारात येत नाही तुम्ही आमच्याकडं यायचं नाही. तुम्ही म्हणता तसं होत नसतं तसा कायदा चालत नसतो. त्यामुळं ते काहीही बोलतात, प्रसिद्धीसाठी ते काहीही बोलत आहेत. उद्यापासून आम्हाला त्यांना महत्वचं द्यायचं नाही. आधी ते आमच्या नजरेत किती मुरब्बी राजकारणी होते ते आता राहिले नाहीत, अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी भुजबळांना प्रत्युत्तर दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Election: हायव्होल्टेज लढत! 45 वर्षांपासून निष्ठावंत 'अपक्ष' विरुद्ध भाजपचा काँग्रेसमधून ‘आयात’ उमेदवार, 'या' प्रभागात तगडी फाईट

Latest Marathi News Live Update : जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी लातूर ग्रामीणमध्ये भाजपाला मोठा धक्का

Weekly Love Horoscope 12 to 18 January 2026: शुक्र मकर राशीत प्रवेश करताच ‘या’ लोकांच्या लव्ह लाईफमध्ये वाढणार गोडवा

Vaibhav Sooryavanshi: वर्ल्ड कपपूर्वी वैभवची प्रतिस्पर्धींना धडकी भरवणारी खेळी; ९ चौकार, ७ षटकारांची आतषबाजी, १९२ चा स्ट्राईक रेट पण, थोडक्यात हुकलं शतक

Municipal Election Campaign : यायला-जायला वाहन, अन् रोजच्या रोज पैसे बी! महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात रॅलीतील शेतमजूर महिलांना रोजगार

SCROLL FOR NEXT