Maharashtra Politics Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Politics: 'काँग्रेसकडून मविआडी फोडण्याचे प्रयत्न, अनेक आमदार भाजपमध्ये येतील', भाजप खासदाराचा गौप्यस्फोट

लवकरच काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी फोडून बाहेर पडतील असंही भाजप खासदाराने म्हटलंय

अंकिता खाणे (Ankita Khane)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह ८ आमदारांनी शिवसेना-भाजपच्या सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर पक्षात मोठी फुट पडली. त्यानंतर राज्यातील राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. अशातच भाजप खासदाराने मोठा दावा केला आहे.

'राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर काँग्रेस आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे लवकरच काँग्रेसचे आमदार महाविकास आघाडी फोडून बाहेर पडतील', असा दावा भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला आहे. काँग्रेसकडून महाविकास आघाडी फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महाविकास आघाडी फुटल्यानंतर काँग्रेसचे अनेक आमदार भाजपमध्ये सहभागी होतील, असा गौप्यस्फोटही निंबाळकर यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

तर पुढे निंबाळकर म्हणाले की, 'काँग्रेस सध्या महाविकास आघाडीचे नेतृत्व करत असली तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत गेल्याने काँग्रेसचे नुकसान होईल अशी त्यांच्यामध्ये भीती आहे. त्यामुळेच काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडेल', असंही निंबाळकर म्हणाले आहेत.

माढा विधानसभा मतदारसंघातील श्रीपूर ते खंडाळी या पंतप्रधान ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे लोकार्पण सोहळा खासदार निंबाळकर यांच्या आणि माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

YouTube Upload Issue: जगभरातील क्रिएटर्स हैराण! यूट्यूबवर व्हिडिओ अपलोडिंगमध्ये अडचण, नेमकं कारण काय?

Air India: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! २९ आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणांत मोठी कपात; एअर इंडियाचा मोठा निर्णय, जाणून घ्या यादी...

Fuel Crisis: मोदी बोलले, एकनाथ शिंदेंनी अस्तित्वात आणले, सरकारी ताफ्यातील वाहनं कमी करून दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरले

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

SCROLL FOR NEXT