Passport Sakal
महाराष्ट्र बातम्या

Server Down : अमरावती पाठोपाठ पुणे कार्यालयातील कामकाज पुन्हा सुरू

गेल्या चार ते पाच तासांपासून अनेक नागरिक पुण्यातील पासपोर्ट कार्यालयामध्ये बसून आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Server Down In Maharashtra : सर्व्हर डाऊन झाल्याने अनेक ठिकाणच्या पासपोर्ट कार्यालयातील कामकाज ठप्प झाले होते. यानंतर आता अमरावती पाठोपाठ पुण्यातील पासपोर्ट कार्यालयातील कामकाजदेखील पुन्हा सुरू झाले आहे. केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर, गोवा आणि गुजरात येथील पासपोर्ट कार्यलयातदेखील सर्व्हेर डाऊन झाले होते. अमरावती येथीलही पासपोर्ट ऑफिसचे सर्व्हर सकाळी 10 वाजेपासू बंद होते. अखेर दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी सर्व्हर पुन्हा सुरू झाले असून, अमरावती येथील पासपोर्ट कार्यालयातील ठप्प झालेले कामकाज चार तासांनी सुरू झाले आहे. पुणे कार्यालयात सकाळी 8 वाजल्यापासून उभे असलेल्या नागरिकांना दुपारी 4 वाजता प्रवेश देण्यात आला असून, कार्यालयात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील पुणे, परभणी, अमरावती येथील पासपोर्ट कार्यालयांमधील सर्व्हर सकाळपासून डाऊन झाला होता. यामुळे अमरावती, पुणे, परभणी येथील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते. पासपोर्ट कार्यालयांकडून विविध कामांसाठी नागरिकांना अपॉइन्मेंट दिली जाते. त्याप्रमाणे आज ज्या नागरिकांची अपॉइन्मेट होती ते संबंधित पासपोर्ट कार्यालयांमध्ये गेले होते. मात्र, या ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्यामुळे पासपोर्टशी संबंधित सर्व कामं ठप्प झाली. यामुळे या ठिकाणच्या नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले.

राज्यातील पुणे, अमरावती आणि परभणी येथील पासपोर्ट कार्यालयांमधील सर्व्हर डाऊन असल्याचे समोर आले होते. दरम्यान, पुण्यातील पासपोर्ट कार्यालयामध्ये नागरिकांना नेमकं काय अडचण आहे याबाबत काही सांगण्यात न आल्याने नागरिकांनी मोठा रोश व्यक्त केला. ज्यावेळी नागरिकांचा संताप अनावर झाला त्यानंतर याठिकाणी सिस्टिम डाऊन अशा स्वरुपाचा बोर्ड लावण्यात आला. तर, दुसरीकडे जर सकाळपासून सर्व्हर डाऊन होता तर, त्यासंबंधी पासपोर्ट कार्यालयाकडून मेल किंवा मेसेज का केले नाही असा सवाल संतप्त नागरिकांना उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Nashik Police Bribery Case : लाचखोर हवालदाराला चार वर्षे सक्तमजुरीसह 5 हजार रुपये दंडाची शिक्षा; 10 हजारांची लाच स्वीकारताना पकडलेलं रंगेहाथ

SCROLL FOR NEXT