Eknath Shindeand Manoj Jarnge Patil  
महाराष्ट्र बातम्या

Maratha Andolan : मोठी अपडेट! मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन उदय सामंत विशेष विमानाने जालन्याकडे रवाना

रवींद्र देशमुख

मुंबई - मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला असून सरकार देखील अडचणीत आलं आहे. जालना येथे सुरू असलेल्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी राज्यसरकार पूर्ण प्रयत्न करत आहेत. मात्र उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील आरक्षणावर ठाम आहेत. त्यातच आज राज्य सराकरच्या वतीने उत्तर महाराष्ट्रात शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारमधील मंत्री उदय सामंत यांना आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी जालन्याला पाठवलं आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश घेऊन जालना आंतरवली सराटी गावाकडे तात्काळ रवाना झाले आहे. उद्योग मंत्री उदय सामंत आज जळगावात “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सहभागी होणार होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांना विशेष संदेश देऊन मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले आहे.

उद्योग मंत्री उदय सामंत जळगावहून विशेष विमानाने औरंगाबादला पोहोचणार आहे. त्यानंतर ते जालन्यासाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी सामंत यांनी आंदोलनस्थळी उपस्थित असलेले शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे आणि नेते अर्जून खोतकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT